सत्तास्थापनेबाबत कोणत्याही क्षणी ‘गोड’ बातमी येऊ शकते : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते अशी माहिती दिली आहे. भारतीय पक्षाच्या राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते बोलत होते.

सरकार स्थापनेविषयी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की , ‘महाजनादेश महायुतीबरोबर आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते. आम्ही शिवसेनेची वाट बघणार असून आमचेच सरकार सत्तेत येणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच पु्न्हा मुख्यमंत्री होणार असून आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करणार असून आम्ही सेनेला प्रस्ताव पाठवला आहे. आता आम्हाला शिवसेनेच्या प्रस्तावाची प्रतिक्षा आहे. युतीतील तिढा आमच्या दृष्टीने संपला असून आता शिवेसेनेने एक पाऊल पुढं यायला हवं. शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. ‘

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.

Visit : Policenama.com