Sudhir Mungantiwar | मोदींसमक्ष केलेल्या ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार, मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई : Sudhir Mungantiwar | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल चंद्रपुरात प्रचारसभा झाली. या सभेत भाजपा उमेदवार आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत आक्षपार्ह असे वक्तव्य केले. तसेच बहिण-भावाच्या नात्यावर असभ्य भाषा वापरली. पंतप्रधानांच्या समोर हा प्रकार घडला. यावरून काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे तक्रार केली असून मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांच्या त्या वक्तव्याचे विशेषता महिला वर्गात संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

अतुल लोंढे यांनी राज्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा आणि अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे. मुनगंटीवार यांनी भाषणात महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करुन महिलांची बदनामी केली आहे.

मुनगंटीवार यांनी चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला खीळ घालणारा व मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यांची कृती केवळ आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारी असून लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रद्द करावी,
त्यांच्यावर आणि भाजपवर निवडणूका लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेसने या तक्रारीद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार…
चंद्रपुरातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाषण करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले,
भाऊ-बहिणीला गळफास लावणारा आणि एकाच बेडवर भाऊ-बहिणीला विवस्त्र झोपवणारा काँग्रेस पक्ष आहे,
असे वक्तव्य केले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित