Sugarcane Juice In Pregnancy : गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : उन्हाळ्यात ऊसाचा रस मोठ्या प्रमाणा सेवन केला जातो. परंतु गरोदर महिलांनी उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण याचा थेट परिणाम गर्भावर होत असतो. गरोदरपणात ऊसाचा रस पिणे लाभदायक आहे की नुकसानकारक ते जाणून घेवूयात…

ऊसाचा रस पिण्याचे फायदे आणि घ्यावयाची काळजी
1 गरोदर महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, ऊसाचा रस प्यायल्याने या समस्येपासून दिलासा मिळतो.

2 गरोदरपणात ऊसाचा रस एखाद्या अँटीऑक्सीडेंट प्रमाणे काम करतो.

3 गरोदरपणात थकवा आणि आजारांपासून वाचण्यासाठी ऊसाचा रस खुप लाभदायक ठरतो, यामुळे इम्यूनिटी वाढते.

4 गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी स्वच्छतेची काळजी घ्या. रस्त्याच्या कडेला मिळणारा ज्यूस टाळा. यामुळे फूड पॉयजनिंग किंवा इन्फेक्शनची समस्या होऊ शकते.

5 ऊसाच्या रसात शुगर मोठ्या प्रमाणात असते आणि याचे जास्त सेवन केल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.