धक्कादायक ! IAS अधिकाऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

बंगळुरू : वृत्तसंस्था – देशात कोरोनामुळे लॉकडाऊन काळात अनेकांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे. त्यातच बंगळुरूतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूतील आयएएस अधिकारी बीएम विजयाशंकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरू येथील राहत्या घरी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. एक हजार कोटी आयएमए आर्थिक फसवणुकीतील ते मुख्य आरोपी होते.

बीएम विजायाशंकरन यांना 2019 मध्ये एसआयटीने अटक केली होती. त्याशिवाय काही काळ ते तुरुंगात देखील रहावे लागले होते. यावेळी चौकशी दरम्यान विजयाशंकर यांच्याकडून 2.5 कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, राज्यातील भाजप सरकारने पुढील चौकशी सीबीआयकडे सोपवली होती. तुरुंगातून आल्यानंतर ते नैराश्यात असल्याची बाब काही जणांनी सांगितली.

विजयाशंकरन आधी कर्नाटक प्रशासकीय सेवा (KAS) अधिकारी होते. त्यानंतर ते आयएएस झाले. घोटाळा उघडकीस आला. त्यावेळी ते उपायुक्त बंगळुरू शहर या पदावर कार्यरत होते. अधिकाऱ्याच्या आत्महत्येती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी विरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. सध्या पोलीसांकडून पुढील तपास सुरु आहे.