Sujay Vikhe Patil | पार्थ पवार-सुजय विखेंची अचानक भेट, राजकीय तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते एकमेकांवर सतत टीका करत आहेत. यासोबत ईडी (ED), आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाईवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या सर्व घटनांवरुन राज्यातील राजकीय (political) वातावरण चांगलेच तापले असताना भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या एकत्र विमान प्रवासाचे फोटो व्हायरल (Photo viral) होत आहे. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि पार्थ पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि पार्थ पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. दोघांनीही जवळपास 40 मिनिटे एकत्र प्रवास केला.
या प्रवासादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली. औरंगाबाद ते मुंबई (Aurangabad to Mumbai) या प्रवसानंतर सुजय विखे पाटील यांनी आपल्या
सोशल मीडिया अकाऊंट्सवर दोघांचे विमानातला आणि विमानतळावरचे फोटो पोस्ट केले आहे.
हे फोटो शेअर करत असताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, सर्व सीमांच्या पलिकडची मैत्री (Friendship Beyond Boundaries..!).
आपल्या फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरुन विखे यांनी हे फोटो शेअर केले आहेत.

 

राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतात. मात्र असे असले तरी दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची मैत्री हा एक वेगळा भाग असते.
राजकीय विरोधक असले तरी दोन नेत्यामध्ये मैत्री असल्याची अनेक उदाहरण राज्यात आहेत.
त्याचाच एक भाग सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्याबाबतही आहे.
सुजय विखे पाटील यांनी पार्थ पवारांसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

 

Web Title : Sujay Vikhe Patil | bjp mp sujay vikhe patil and ncp leader ajit pawar son parth pawar travel in same plane photos goes viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aryan Khan Drug Case | आर्यन खानचे NCB ला वचन; म्हणाला – ‘मी एक जबाबदार नागरिक बनणार’

Sameer Wankhede | ‘लेडी डॉन’वरून नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ‘हल्लाबोल’

Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश

Mohan Bhagwat | ‘370 कलम रद्द केल्यानंतरही जम्मू काश्मीरमधील समस्येचं पूर्णपणे निराकरण नाही’