भांडणात ‘खुल्लमखुल्ला’ फाडले मुलीचे कपडे, ‘मदत’ करण्याऐवजी ‘हासत’ राहिले लोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुल्तानपुरी भागात काल रात्री एक धक्कादायक घडना घडली आणि माणूसकीला काळीमा फासला गेला. घर मालक आणि भाडेकरु कुटूंब यांच्यात वाद झाला. या वादात एका तरुणीचे सर्वांदेखत कपडे फाडण्यात आले आणि लोक हे पाहून हसत राहिले. परंतू कोणीही तरुणीचे शरीर झाकण्यासाठी दुसरा कपडा दिला नाही.

पीडित तरुणीचे म्हणणे आहे की तिची आब्रु लुटली जात होती आणि लोक हसत होते. जर या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर ती पोलीस स्टेशनबाहेर आत्मदहन करेल. पोलिसांनी या प्रकरणी क्रॉस एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अजय उर्फ बंटी, जितेंद्र आणि विनोद हे आरोपी आहेत.

पोलिसांनी काही व्हिडिओ क्लिप देखील ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की या प्रकरणी एफआयआर दाखल करुन तपास करण्यात येत आहे. तपासात जर कोणी दोषी आढळले तर लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल. माहितीनुसार पीसीआरला रात्री सुल्तानपुरी डी ब्लॉक भागात वाद झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलीस योग्यवेळी घटनास्थाळी पोहचले.

घर मालक आणि भाडेकरु यांच्याच वाद झाला होता. या जखमींना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये बेबी, पूजा त्यांचा भाऊ अजय, गुलाब यांच्या समावेश आहे. या प्रकरणी घर मालकाची मुलगी पूजा हिने पोलिसांना माहिती दिली की घरासमोरच त्यांचे भाडेकरु राहतात, ज्यांनी मागील 3 महिन्यांपासून घरभाडे दिले नाही.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like