सुनील कांबळे यांना मंगळवार पेठेतून सर्वात जास्त मताधिक्य देणार : सदानंद शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवर सुनील कांबळे यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी कंबर कसली आहे. सदानंद शेट्टी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांनी सुनील कांबळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. कांबळे यांच्या विजयासाठी मंगळवार पेठेत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवार पेठेत आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये सदानंद शेट्टी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक गणेश बिडकर, स्थायी समितिचे अध्यक्ष सदानंद शट्टी, पल्लवी जावळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहाभाग घेत सुनिल कांबळे यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. मंगळवार पेठ परिसरातमध्ये सदानंद शेट्टी यांचे सामाजिक कार्य जास्त असल्याने त्या ठिकाणी त्यांचा मोठा परिचय आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील एसआरए सारख्या प्रकल्पातून सुनिल कांबळे यांना फायदा होणार आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना सदानंद शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय काकडे आणि गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजचे काम करणार आहे. तसेच पुणे कॅन्टोन्मेट विधानसभा मतदार संघामध्ये विजयी रथ खेचून आणणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच युतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सदानंद शेट्टी यांनी सांगितले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like