WhatsApp समोर मोठी अडचण ! व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सर्व्हिस विरूध्द SC मध्ये होणार सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  गूगल पे आणि पेटीएमसारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट यंत्रणा राबवणाऱ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी Whatsapp ने आपली बीटा पेमेंट सेवा सुरू केली पण ती आता अडचणीत आली आहे. Whatsappने ही सेवा देताना सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा गूड गव्हर्नन्स चेंबर्स या थिंकटँकने केला आहे. या थिंकटँकने Whatsapp विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात फिर्यादही दाखल केली आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने Whatsapp, RBI आणि NPCI ला तीन आठवड्यांत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे Whatsappने या महिन्याच्या शेवटापर्यंत ही सेवा बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे.