INX Media Case : P. चिदंबरम ‘गोत्यात’ ! अटकपूर्व जामिनावर सुनावणीस SC चा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयएनएक्स मीडिया प्रकरणी सध्या सीबीआय कोठडीत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने आज नकार दिला. न्यायमूर्ती भानुमती यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. पी. चिदंबरम यांची आज सीबीआय कोठडीची मुदत संपणार आहे.

खंडपीठाने अटकपूर्व जामीनावर सुनावणीवर निर्णय देताना म्हंटले आहे की ,’जर कोणत्याही तपास यंत्रणेने कोणत्याही आरोपांविरोधात चौकशीसाठी कोणाला अटक केली असेल तर त्याची अटकपूर्व जामीन याचिका आपोआपच निष्प्रभ्र होऊन जाते. जर आपल्याला जामीन हवा असेल तर त्यासाठी योग्य त्या कोर्टात जावं, असा सल्लाही खंडपीठाने चिदंबरम यांच्या वकिलांना दिला आहे.

चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडी देखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते. सीबीआय कोर्टाने पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like