अल्पवयीन पिडीतेनं दिला मुलाला जन्म, बलात्कार करणार्‍या 84 वर्षीय वृध्दाची होणार DNA टेस्ट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी असणाऱ्या 84 वर्षीय वृद्धाच्या डीएनए चाचणीचे आदेश दिले आहेत. कोर्टाने आदेश दिले आहेत की, मुलाचे वडील शोधण्यासाठी मुलगा आणि आरोपी दोघांची डीएनए चाचणी घेण्यात यावी. ही घटना पश्चिम बंगालमधील मटिगरा भागातील आहे, जी 2012 मध्ये घडली होती. 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारा आरोपी 84 वर्षांचा आहे. बलात्कारानंतर मुलीने मुलाला जन्म दिला.

सुप्रीम कोर्टाने मुलाचे आणि आरोपीचे डीएनए टेस्ट जुळवून मुलाच्या वडिलांचा शोध घेण्यास सांगितले आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आरोपीच्या बचावामध्ये त्याचे वय आणि आरोग्याचा हवाला देत बलात्कार अस्वीकार्य असल्याचा युक्तिवाद केला होता..

कोलकाता हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जामीन घेण्याचा आदेश दिला आहे. घटनेच्या वेळी आरोपी 76 वर्षांचा होता. दरम्यान, हे प्रकरण यापूर्वी चर्चेत आले आहे. या क्षणी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. आता दोघांच्या डीएनए चाचणीनंतरच पुढे काय होईल हे समजेल.