Supreme Court | …तर लोकसभा निवडणुकीला उशीर होईल, ‘त्या’ याचिकेवर सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितले

नवी दिल्ली : Supreme Court | ईव्हीएममधील त्रुटींबाबत दिल्ली प्रदेश काँग्रेसने (Congress) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सध्याची प्रक्रिया परिपूर्ण असून, प्रत्येक पक्ष त्यावर विश्वास ठेवू शकतो, तसेच ही प्रक्रिया पूर्ण देशभरात राबवण्यात आली, असेही न्यायालयाने (Supreme Court) म्हटले.

२०२४ च्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये काही त्रुटी असल्याचा आरोप दिल्ली काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केला होता. तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची (VVPAT Machine) प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, ही प्रक्रिया खूप विस्तृत आहे. राजकीय पक्षांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. तसेच ही प्रक्रिया संपूर्ण देशात राबवली जात आहे.

कोर्टाने म्हटले की, काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणे आवश्यक होते. आम्ही या मुद्द्यावर दखल देणार नाही. जर आम्ही यात हस्तक्षेप केला तर निवडणुकांना उशीर होईल. त्यानंतर काँग्रेसने दाखल केलेली याचिका मागे घेतली. (Supreme Court)

तत्पूर्वी, दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अनिल कुमार यांनी दिल्ली हायकोर्टात सुद्धा याचिका दाखल केली होती.
यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय स्तरावरील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची
प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. सुनावणीनंतर दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vidhan Sabha Elections | बिगुल वाजला! मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, मतमोजणी एकाच दिवशी

Maharashtra Cabinet Expansion | अजित पवार गटाचा महायुतीमध्ये वरचष्मा; मंत्रीमंडळ विस्तारामध्ये राज्यासह केंद्रात दिली जाणार 3 राज्यमंत्रिपदे