सुप्रिया सुळेंनी चूक दाखवताच अमित शहा यांनी दिली ‘ही’ कबुली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 सादर केले. यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केला. अखेर बहुमताने हे विधेयक पारित करण्यात आले. यावेळी सभागृहात काँग्रेसने जोरदार विरोध दर्शवला. गृहमंत्री अमित शहा यांनी सहा ते सात तास या विधेयकावर चर्चा केली. यादरम्यान शहा यांच्याकडून एक चूक झाली होती, जी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली.

नागरिकत्व सुधारणा विधेयकास लोकसभेत ३११ जणांच्या बहुमताने संमत करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेने या विधेयकाला लोकसभेत पाठींबा दिला. राज्यसभेत मात्र सेनेने या बिलाच्या बाबतची आपली भूमिका बदलली. अमित शहांनी देखील यासंबंधीच्या विविध बाबींवर स्पष्टपणे चर्चा केली. यादरम्यान अमित शहा यांच्याकडून छोटीशी चूक झाली. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी ही चूक दाखवताच शहांनी ती चूक कबूल असल्याचे सांगत ती दुरुस्त केल्याचंही स्पष्टीकरण दिल.

काय झाली होती नेमकी चूक
संयुक्त समितीमध्ये बोलताना अमित शहा म्हणाले होते की, लोकसभेत या विधेयकाला धर्माच्या मुद्द्यावर कोणाचाही आक्षेप नाही. मात्र सुप्रिया सुळे यांनी अमित शहांच्या वाक्याला कोट करत धर्माच्या मुद्द्याला आमचा आक्षेप आहे. आम्हीही लोकसभेतील सदस्य आहोत असे म्हणत अमित शहांची चूक लक्षात आणून दिली.

यानंतर अमित शहा यांनी आपली चूक कबुल करत सदरच्या भाषणामध्ये मी बदल केल्याचे अमित शहांनी लोकसभेतील विधेयकावेळी झालेल्या चर्चेमध्ये सांगितले.

Visit : policenama.com