बिग बॉसच्या घरात झळकणार ‘ही’ नृत्यांगणा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बिग बॉस मराठी २ च्या नवीन पर्वाला सुरुवात होणार असून या कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर करणार आहेत. यामध्ये कोणकोण सहभागी होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. यंदा राजकारणातील एखादी व्यक्ती दिसणार असल्याचे समजले होते. पण आता मात्र यामध्ये कोण सहभागी होणार हे स्पष्ट झाले आहे. बिग बॉस चा प्रोमो लॉंन्च झाल्यापासून या कार्यक्रमात लावणी क्षेत्रातील नृत्यांगणा झळकणार आहे. या नेमक्या कोण ते आपण सविस्तर जाणून घेऊया…

नवा प्रोमो प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार असून यामध्ये आपल्याला एक नर्तिका पहायला मिळणार आहे. जिने आपल्या अदाकारीने भल्याभल्यांचे फेटे उडविले आहे. ही नर्तिका दुसरी कोण नसून चक्क सुरेखा पुणेकर आहे. हे कळाल्यावर सर्वांना आनंदाचा धक्का नक्कीच बसणार आहे. प्रेक्षकांना त्या बिगबॉसच्या कार्यक्रमात पाहण्यास नक्कीच आनंद वाटेल.

लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर यांनी अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना केला आहे. यांवर मात करत त्या आज खुप मोठ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना बिगबॉस च्या कार्यक्रमात पाहून त्यांचे फॅन नक्कीच आनंदी होतील यात शंकाच नाही. पण सुरेखा पुणेकर या कार्यक्रमात सहभागी होतील का ? हे कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर कळेल.

रसिकांना महेश मांजरेकरांनी प्रश्न विचारला की, शुभ्र पांढरा सदरा, समोर बघ्यांची गर्दी… आश्वासनांच झाड लावणारे, लावणार का बिग बॉस मराठी २ च्या घरात वर्दी ?

Loading...
You might also like