सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा CBI तपास करणार, संजय राऊत म्हणाले – ‘पुर्वीपासूनच स्क्रीप्ट होती तयार’

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडून सीबीआयला मिळाल्यानंतर शिवसेने नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत म्हणाले की, “मला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी तपास योग्य प्रकारे केला आहे आणि मुंबई पोलिसांना त्यांच्याच प्रदेश नेत्याकडून (भाजपा नेत्याकडून) बदनामी केली जात आहेत, हे योग्य नाही.”

शिवसेना नेते संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील कायद्याची यंत्रणा सर्वात वर आहे. येथे सत्य आणि न्यायाची नेहमीच जीत होते. इथे कायद्यापेक्षा वर कोणी नाही. आपली राज्य परंपरा अशी आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. जे आरोप केले गेले आहेत ते योग्य नाहीत. मला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणार नाही. कायदेतज्ज्ञ किंवा मुंबई पोलिसांचे आयुक्त यावर बोलतील.

गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामा देण्याच्या भाजपच्या मागणीवरुन शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, राजीनामा देण्याची बाब पुढे आली तर ती दिल्लीला जाईल. लोकांनी विचारपूर्वक भाष्य करावे. आपल्या राज्याचा कारभार आणि प्रशासन या देशात सर्वोच्च आहे. पहिल्या दिवसापासून सुशांत प्रकरणात राजकारण होत आहे. पूर्ण निकाल मिळाल्यानंतर सरकारकडून पुढील पावले उचलली जातील.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल देताना सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार दिले. सुशांतचे कुटुंबिय आणि त्यांचे चाहते बर्‍याच दिवसांपासून सीबीआय चौकशीची मागणी करत होते. बिहारमध्ये दाखल झालेल्या एफआयआरला सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवलं आहे. तसेच, मुंबई पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची तपास केला नाही तर फक्त चौकशी केली. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना सीबीआयकडे सर्व कागदपत्रे देण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकते.