SSR Death Case : सुशांतच्या प्रकरणात आतापर्यंत नाही मिळाले हत्येचे पुरावे, CBI चा आत्महत्येवर ‘फोकस’, ‘फॉरेन्सिक’ रिपोर्ट महत्वाचा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सुशांत प्रकरणात सीबीआयचा तपास सातत्याने सुरूच आहे. या प्रकरणाची मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीसह प्रकरणाशी संबंधित बाकीच्या लोकांच्या चौकशी दरम्यान सीबीआयने अनेक रहस्ये समोर आणली आहेत. पण मृत्यूचा हा गुंता अद्याप सुटलेला नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणाशी संबंधित सीबीआयच्या तीन अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुशांतच्या हत्येचा पुरावा अद्याप मिळालेला नाही. तथापि तपास अद्याप चालू आहे.

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते सुसाइड अँगलवर लक्ष केंद्रित करत आहेत. हे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याबाबतचे प्रकरण आहे का याचीही चौकशी ते करीत आहेत. आतापर्यंत सीबीआयने क्राइम सीन ला री-क्रिएट केले आहे, मुंबई पोलिसांकडून जमवलेल्या सर्व पुराव्यांची तपासणी केली आहे आणि या प्रकरणाच्या प्रत्येक संशयितांची चौकशी केली आहे.

टीमच्या म्हणण्यानुसार, फॉरेन्सिक अहवाल, कबुलीजबाब किंवा क्राइम सीनच्या री-क्रिएशनला पाहिले तर यामध्ये मिळालेला कोणताही रिपोर्ट होमीसाइड (खून) ला दर्शवत नाही. मात्र, अद्याप त्यांचा तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणात आत्महत्येच्या अँगलवर अजून कठोर चौकशी केली जाईल. ते या खुनाच्या तपासाला अधिकृतपणे बंद करत नाही आहेत.

एम्सच्या फॉरेन्सिक अहवालावर टाकून आहे सीबीआय चौकशी

या प्रकरणातील पुढील महत्त्वाचा पुरावा म्हणजे एम्स फॉरेन्सिक टीमचा अहवाल. या अहवालात सुशांत सिंह राजपूत यांचा पोस्टमार्टम व शवविच्छेदन अहवाल आहेत. मंगळवारी प्रकरणाची ओरापी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रियाच्या पालकांचीही चौकशी करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, या प्रकरणात ड्रग्स अँगलच्या आगमनावर ईडीने गौरव आर्याला देखील चौकशीसाठी बोलावले.