रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स कनेक्शनमध्ये ‘या’ 5 जणांच्या नावाचा समावेश, जाणून घ्या यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगल खूप मोठा होत चालला आहे. एनसीबीने रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीला रिमांडमध्ये अगोदरच घेतले आहे, आता रियावर सुद्धा अटकेची टांगती तलवार लटकत आहे. सांगितले जात आहे की, रियाच्या विेरूद्ध दीपेश सावंतने अशी कबुली दिली आहे, ज्यामुळे एनसीबीला अ‍ॅक्ट्रेसच्या विरूद्ध आणखी मजबूत पुरावा मिळाला आहे.`

त्यामुळे जर एनसीबीने आज रियाला अटक केली तर आश्चर्य वाटणार नाही. एनसीबीने पूर्ण तपास केल्यानंतर रियावर फास आवळण्यास सुरूवात केली आहे. रिया आणि अन्य लोकांमधील जे चॅट समोर आले आहे, ते पाहता रिया सतत ड्रग्ज जगताशी जोडलेली होती असे दिसते. काही अशा व्यक्ती सुद्धा समोर आल्या आहेत, ज्यांच्या संपर्कात रिया सतत होती –

दीपेश सावंत
सुशांत सिंह राजपूतचा हेल्पर दीपेश सावंतने ड्रग वादात एनसीबीसमोर असे खुलासे केले आहेत, ज्यामुळे रियाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दीपेशने मान्य केले आहे की, रिया ड्रग मागवत होती आणि दीपेश ते ड्रग आणत होता. आता दिपेश आणि आणि रियाचा ड्रगप्रकरणात थेट संबंध समोर आला आहे.

शौविक
रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती तर या ड्रग अँगलमध्ये एक मास्टमाईंड म्हणून समोर आला आहे. शौविक ड्रग पॅडलर्सच्या संपर्कात होता, तसेच सुशांतसाठी ड्रग्ज सुद्धा मागवत होता. तर रिया आणि शौविकमधील असे व्हॉट्सअप चॅट सुद्धा समोर आले आहे ज्यातून दिसत की, रिया, आपल्या भावाद्वारे सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करत होती.

गौरव आर्या
हॉटेल जगतात गौरव आर्या हे नाव प्रसिद्ध आहे. सुशांत केसमध्ये गौरवला सुद्धा महत्वाचा दुवा मानले जात आहे. गौरवसोबत रिया चक्रवर्तीची चर्चा झाल्याचे समोर आले आहे. गौरवने ईडीला सांगितले होते की, 2017 मध्ये रियाशी गोव्यात भेट झाली होती. गौरवने या गोष्टींचा उल्लेख केला आहे की, रियाने त्याच्याकडे एकदा ड्रग्जबाबत चर्चा केली होती, परंतु त्याने हे मानण्यास नकार दिला की, तो ड्रग्जच्या धंद्यात सहभागी आहे. आता गौरव आर्याने स्वताला या प्रकरणापासून दूर ठेवले आहे. परंतु असा व्हॉट्सअप ग्रुप सापडला आहे, ज्यामध्ये रियाचे मित्र आणि गौरवसुद्धा आहे. त्या ग्रुपमध्ये ड्रग्जबाबत सुद्धा झाली आहे.

जया साहा
टॅलेंट मॅनेजर जया साहाचे नाव सुद्धा अनेक वेळा समोर आले आहे. सुशांतच्या ड्रग्ज अँगलमध्ये हा महत्वाचा दुवा आहे. प्राथमिक तपासात याची आणि रियाची चर्चा समोर आली आणि अँगल मोठा होत गेला. 25 नोव्हेंबर 2019 ला रियाशी त्याची चर्चा झाली होती. त्या चॅटमध्ये जया, रियाला सांगत आहे की, – चहा किंवा कॉफीमध्ये फक्त 4 थेंब टाक आणि ते प्यायला दे. 30 ते 40 मिनिटात किक मिळेल. या चॅटद्वारे अंदाज लावला जाऊ शकतो की, रियाचे सुद्धा ड्रग्ज प्रकरणात कनेक्शन होते.

श्रुती मोदी
सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर श्रुती मोदीने सुद्धा ड्रग प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. तिने चौकशीत मान्य केले की, सुशांतच्या घरी ड्रग्जचे वातावरण कायम असायचे आणि पार्ट्यातर नेहमीच होत असत. तर श्रुतीच्या वकिलांनी सांगितले की, त्यांची क्लाईंट तर 10 दिवसानंतरच सुशांतकडील जॉब सोडणार होती. तिला ड्रग कल्चर पसंत नव्हते.