‘सुशांत लॉकडाऊन मध्ये ड्रग बद्दल खूप बेचैन होता’, शोविकनं सांगितलं

मुंबई : वृत्तसंस्था – सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविकने एनसीबीला दिलेल्या एका निवेदनानुसार, सुशांतच्या सभोवतालच्या ड्रग्स सिंडिकेटचा प्रत्येक मुद्दा समोर आला आहे. या सिंडिकेटच्या प्रत्येक व्यक्तीला आता अटक होऊ शकते. पण या वक्तव्यानुसार सुशांत व्यसनाधीन होता आणि लॉकडाऊनमध्ये ड्रग्जमुळे तो खूप बेचैन होता, हेही समोर आले आहे.

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीने मोठा खुलासा केला आहे. शोविकच्या विधानावरून तुम्हाला ड्रग्सचा संपूर्ण खेळ समजून येईल. मादक पदार्थांसाठी पैसे कोणाला द्यायचे ? कोणत्या ड्रगसाठी ऑर्डर दिली गेली ? ड्रग कसं यायचं ? कोण आणायचं ? ड्रग्जच्या कनेक्शनमध्ये शोविक कसा अडकला ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोविक चक्रवर्तीनं नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला दिली आहेत. तो सुशांतच्या घरी ड्रग्ज पुरवत होता, अशी कबुली एनसीबीला कबुली दिली. सुशांतच्या घरी बॅगमध्ये चरस पुरवठा होत होता, अशी कबुलीही शोविकने दिली. एवढेच नाही तर शोविकने ड्रग्सच्या पेमेंट बद्दलचे देखील रहस्य उघड केले आहेत. त्याने दावा केला की रियाने एकदा गांजा साठी क्रेडिट कार्डद्वारे पैसे दिले होते. याशिवाय सुशांतच्या पैशातूनच अनेकदा पेमेंट केले जात असे. हे पैसे सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा देत होता.

एनसीबीसमोर शोविकने जसं आपलं तोंड उघडलं, तशी अनेक रहस्येही समोर येण्यास सुरुवात झाली. शोविकने रियाशी व्हॉट्सअ‍ॅपवर ड्रग्जबाबत केलेल्या संभाषणाची कबुली दिली. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये शोविकने त्याला दोनदा ड्रग्स देण्याची कबुली दिली होती. शोविकने सांगितले की 16 मार्च रोजी सुशांतने त्याला ड्रग्ज आणण्यास सांगितले. त्यानंतर रियाने व्हॉट्सअॅप चॅटवर सांगितले की ड्रग किती मागवायचं आहे. शोविकने यासाठी बासितशी संपर्क साधला. सॅम्युएलला बासितचा नंबर देण्यात आला. त्यानंतर सॅम्युएलने बासितच्या माध्यमातून सॅम्युएलचं बोलणं विलात्राशी झालं आणि 17 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता झैदने बांद्रामध्ये सॅम्युएलला ड्रग आणून दिलं.

आजतक कडे मार्चमध्ये रिया आणि शोविक यांच्यामध्ये झालेलं व्हॉट्सअॅप चॅट आहे, ज्यात ड्रग्सविषयी बोलले जात आहे. मार्चनंतर 15 एप्रिलला ड्रग्स ऑर्डर देण्यात आल्याचेही शोविकने उघड केले. यावेळी सॅम्युएल मिरांडाने त्याच्याशी संपर्क साधला.15 एप्रिलला सुशांतने त्याला सांगितले होते की त्याच्याकडं असलेलं ड्रग्ज संपत आहे. 17 एप्रिल रोजी सॅम्युअल मिरांडाने व्हॉट्सअ‍ॅपवर ड्रग्जसाठी मेसेजदेखील केला.

रियाने शोविकला सुशांतसाठी ड्रग्स आणण्यास सांगितले. ज्यासाठी बासितशी पुन्हा एकदा संपर्क साधला. यावेळी दीपेश सावंतने या ड्रग्जची डिलिव्हरी घेतली होती. ही डिलिव्हरी सुशांतच्या घराजवळ करण्यात आली होती. शोकिकने एनसीबीसमोर दावा केला की त्याने कधीही ड्रग्जसाठी पैसे दिले नाहीत.

शोविकच्या कबुलीवरही बरेच प्रश्न निर्माण होतात. सुशांतची प्रकृती सतत खालावत असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. तर सुशांतला मार्च आणि एप्रिलमध्ये ड्रॅग का दिलं गेलं? जरी आपण असे गृहीत धरले की सुशांत स्वत:च्या इच्छेनुसार ड्रग्स घेत होता, तरी थांबण्याचा प्रयत्न का केला नाही? रियाने त्याच्या कुटूंबियांना सांगितले होते का की, आजारी असूनही ती ड्रग्ज घेत आहे? रिया आणि शोविकच्या भोवतालचे बरेच प्रश्न आहेत. पुढील तपास आणि चौकशीत एनसीबी अनेक खुलासे करू शकते.