SSR Death Case : रिया चक्रवर्तीसह ‘हे’ 10 जण CBI च्या ‘रडार’वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला आता दोन महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. या दोन महिन्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या. अनेक नवनवीन माहिती समोर आली. आता या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्यामुळे येथून पुढचा तपास सीबीआय करणार आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचा दस्तावेज सीबीआयला द्यावे लागणार आहेत. तसेच मुंबई पोलिसांना या प्रकरणात सीबीआयला सहकार्य देखील करावे लागणार आहे. तसे आदेश सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिले आहेत.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयचे अधिकारी करणार असल्याचे कोर्टाने सागितल्यानंतर सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, सीबीआयमध्ये काम केलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी कोर्टाने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सीबीआय देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन तपास करु शकते. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सीबीआयच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावे लागणार आहे.

क्राइम सीन रिक्रिएट करणार

सीबीआय सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सुरुवात त्याच्या फ्लॅटमधील त्याच खोलीत जाऊन क्राइम सीन रिक्रिएट करु शकते त्याच्या मृत्युवेळी घरात उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब नोंदवू शकतो. रिया चक्रवर्तीचा देखील जबाब नोंदवण्यात येईल. तसेच रियाचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत आणि इतरांच्या चौकशीसाठी समन्स बजावला जाऊ शकतो.

सीबीआयच्या रडारवर 10 लोक

रिया चक्रवर्तीसह दहा लोक सीबीआयच्या रडारवर आहेत. यात रिया चक्रवर्ती शिवाय तिचा भाऊ शौविक, वडील इंद्रजीत, सॅम्युअल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, कुक नीरज, त्याची पूर्वीची मॅनेजर श्रुती मोदी आणि रियाची आई संध्या चक्रवर्ती यांचा समावेश आहे. यापैकी सिद्धार्थ पिठानी मुंबई सोडून हैदराबादमध्ये रहात आहे. बाकीचे सर्व मुंबईतच आहेत.