सुशांत प्रकरणाची CBI चौकशी, Ex गर्लफ्रेंड अंकितानं दिली ‘ही’ प्रतिक्रिया, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या निर्णयापासून सुशांतच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनीही या प्रकरणात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर कंगना रनौत, अक्षय कुमार यांच्यासारख्या अनेक स्टार्सने देखील या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुशांतची सह-अभिनेत्री आणि जवळची मैत्रिण असलेली अभिनेत्री कृती सॅनॉन यांनी देखील ट्विट करत म्हटले की आता त्यांनाही या प्रकरणात न्यायाची आशा दिसत आहे.

कृती सॅनॉनने ट्विट केले आणि लिहिले की, मागील दोन महिने खूप अस्वस्थतेत गेले आहेत कारण या प्रकरणाबाबत काहीही स्पष्टपणे समजलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एक आशेचा किरण दिसत आहे की अखेर सत्य समोर येईल. आता विश्वास ठेवा आणि सीबीआयला त्यांचं काम करू द्या. याशिवाय सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने देखील ट्विट करुन लिहिलं की, न्याय तोच जो सत्य सांगेल. सत्याचा विजय झाला.

सीबीआय चौकशीच्या निर्णयाबद्दल चाहत्यांसह सुशांतच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतच्या कुटुंबाची प्रतिक्रिया सोशल मीडियावरही आली आहे. सुशांतची बहीण श्वेता कीर्ति सिंह यांनी ट्विट करुन देवाचे आभार मानले आणि सांगितले की देवाने त्यांच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. तसेच सुशांत सिंह राजपूत यांचे फॅमिली वकील विकास सिंह म्हणाले- सुशांतचे कुटुंब आणि त्यांच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे. आम्ही दोन महिन्यांपासून सुशांत आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडत होतो. मला आशा आहे की आता या प्रकरणात निष्पक्ष चौकशी केली जाईल आणि सुशांत आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल.