सुशांत केस : ड्रग पेडलर्सच्या विरूध्द NCB मोठी कारवाई, मुंबई-गोव्यात तडकाफडकी छापासत्र

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) कारवाईस सुरुवात केली आहे. रिया चक्रवर्ती हीच्यासह सहा जणांना अटक केल्यानंतर एनसीबीने त्यांच्या चौकशीच्या आधारे ड्रग्स माफियांच्या विरोधात कारवाईला वेग दिला आहे. शनिवारी सकाळी एनसीबीच्या पथकाने महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई आणि गोवा येथे छापा टाकला.

एनसीबीची ताबडतोब छापेमारी
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीची टीम ड्रग्ज पेडलर्सच्या ठिकाणांवर छापा टाकत आहे. अनुज केशवानी यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या पथकाने हा छापा टाकला आहे. असे म्हटले जाते की, चौकशी दरम्यान अनुजने ड्रग पेडर्सची माहिती आणि त्याचा पत्ता एनसीबीला दिला होता.

गोवा येथे छापा टाकणार्‍या एनसीबी टीमचे प्रमुख समीर वानखेडे आहेत. सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई आणि गोव्यातील अनेक ठिकाणी छापे टाकले. महत्त्वाचे म्हणजे अनुज केशवानी यांना कैजाननंतर अटक करण्यात आली होती.

कैजानने अनुजच्या नावाचा उल्लेख केला होता
रिया चक्रवर्तीशी संबंधित प्रकरणात अनुजच्या नावाचा खुलासा कैजानने केला होता. त्यानंतर एनसीबीने अनुजला अटक केली. एका दिवसापूर्वीच एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीत भेटले. या बैठकीत पुढील धोरणावर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलची चौकशी करणारे एनसीबी अधिकारीही मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

दिल्लीत झालेल्या या बैठकीनंतर दुसर्‍याच दिवशी एनसीबीने ड्रग पेडर्सच्या अनेक ठिकाणी छापे टाकले. एनसीबीने या प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि इतर 4 जणांना अटक केली आहे. एनसीबी चौकशीत रिया चक्रवर्तीने बऱ्याच मोठ्या नावाचा खुलासा केला आहे, ज्यांच्याविरूद्ध एनसीबी लवकरच कारवाई करू शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like