सुशांतच्या बहिणींवर रिया चक्रवर्तीने लावलेले आरोप काल्पनिक : CBI

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सीबीआयने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणींवर केलेले आरोप बहुतेक काल्पनिक आहेत आणि अंदाजानुसार एफआयआर दाखल करता येणार नाहीत. सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मितू सिंग यांच्यावर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर सीबीआयने असे म्हंटले आहे.

रिया चक्रवर्ती सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण होती. रिया चक्रवर्तीने बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे जून 2020 मध्ये सुशांतने बॅन औषधे खरेदी केल्याचा आरोप केला होता.सीबीआयने म्हटले आहे की सध्याच्या एफआयआरमध्ये दाखल केलेले आरोप बहुतेक काल्पनिक आहेत. सीबीआयने असेही सांगितले कि, सुशांतसिंह राजपूतचे वडील के. के. सिंह द्वारे रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर दाखल केलेल्या तक्रारीचा तपास करत आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता माधव थोरात यांच्यामार्फत आपल्यावर दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. सीबीआयने असेही म्हटले आहे एफआयआर नोंदविण्यापूर्वी पोलिसांनी सामान्य चौकशी करायला हवी होती.

सीबीआय पुढे म्हणाले, “एका कारवाईत दोन एफआयआर नोंदवता येणार नाहीत. सुशांत सिंह राजपूतशी संबंधित सर्व खटल्यांची चौकशी सीबीआय आधीपासूनच करीत आहे. यामुळे मुंबई पोलिसांनी रिया चक्रवर्तीची तक्रार सीबीआयकडे पाठवायला हवी होती, ना कि आणखी एक एफआयआर दाखल करायला हवा होती, म्हणून त्याच गोष्टींवर एफआयआर नोंदवणे नियमांच्या विरोधात आहे.

सीबीआयने असेही म्हटले कि, सुशांतसिंह राजपूत आणि त्याची बहीण प्रियंका यांच्यातील चॅटबद्दल रिया चक्रवर्तीला माहित होते तर तिने सप्टेंबरपर्यंत गप्प बसायला नको होते. सीबीआयने असेही म्हटले आहे की, कोणत्याही भेदभावाशिवाय किंवा दबावाशिवाय चौकशी करत आहेत. मुंबई उच्च न्यायालय आता या खटल्याची सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी करणार आहे.

You might also like