सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला अन् सोबतच केली गेली ‘कोरोना’ची टेस्ट, समोर आलं मृत्यूचं कारण, जाणून घ्या

मुंबई : वृत्तसंस्था – १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशीरा सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून त्यात आत्महत्येची पुष्टी केली आहे. त्याचबरोबर त्याची कोरोना चाचणी देखील केली असून ती निगेटिव्ह आली आहे. त्याचे अवयव तपासणीसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तिथे त्याच्या अवयवांमध्ये कोणतेही विष किंवा औषध नाही, हे तपासले जाईल.

याप्रकरणी गुन्हे शाखा तपास करत आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की, त्यांना सुशांतच्या खोलीतून कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, तो गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात होता. सुशांतच्या घरात काम करणाऱ्या एका नोकराने त्याच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली.

रविवारचा दिवस सुशांतने नेहमीप्रमाणेच सुरू केला. साडेसहा वाजता तो उठला, साडेनऊ वाजता ज्यूस पिला आणि खोलीत बंद झाला. दुपारी १२.३० पर्यंत सुशांत त्याच्या खोलीत बंद राहिला. जेव्हा त्याचा नोकर त्याच्या खोलीत दार ठोठावण्यास गेला आणि सुशांतने दरवाजा उघडला नाही तेव्हा चावी बनवणाऱ्याला बोलवून दार उघडले गेले.

डॉक्टरांनी मृत घोषित केले
रविवारी दुपारी अडीच वाजता सुशांतचा मृतदेह बीएमसी कूपर रुग्णालयात नेण्यात आला, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना खूप धक्का बसला आहे.

मुंबईला पोहोचले कुटुंब
सुशांत सिंह राजपूतचे कुटुंब मुंबईत दाखल झाले असून सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात.

जास्त लोक सहभागी होणार नाही
कोरोना विषाणूमुळे सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्कारात जास्त लोक सहभागी होणार नाहीत. त्याच्या वडिलांव्यक्तिरिक्त आणखी काही जवळचे लोक सहभागी असतील.

डिप्रेशनमध्ये होता सुशांत
अहवालानुसार सुशांत बऱ्याच दिवसांपासून नैराश्यात होता, परंतु नियमित औषधे घेत नव्हता.

लोकप्रिय चेहरा
सुशांत अनेक वर्षांपासून दूरदर्शन आणि चित्रपटांचा लोकप्रिय चेहरा राहिला आहे. ही घटना त्याच्या चाहत्यांसाठी कोणत्याही धक्क्यापेक्षा कमी नाही.