सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं ‘गुढ’ गडदच, फ्लॅटमेट सिध्दार्थ पिठानीनं ‘डिलीट’ केले इंस्टाग्रामवरील जुने पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य सातत्याने अधिक खोल जात आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी यापूर्वीच आत्महत्येची घोषणा केली आहे, परंतु ज्याप्रकारे या प्रकरणात दररोज नवीन तथ्य समोर येत आहेत, त्यावरून मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सुशांत सिंहचा क्रिएटिव्ह मॅनेजर आणि फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीने त्याच्या इंस्टाग्रामच्या जुन्या पोस्ट डिलीट केल्याची माहिती आता मिळाली आहे. पिठानी ती व्यक्ती आहे जो मृत्यूच्या वेळी सुशांतच्या फ्लॅटमध्ये हजर होता आणि सुशांतचा मृतदेह त्याने सर्वप्रथम पाहिला होता.

का डिलीट केल्या जुन्या पोस्ट?
सिद्धार्थ पिठानीच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नजर टाकली, तर त्याच्या टाइमलाइनवर सध्या फक्त चार पोस्ट्स आहेत आणि त्या चारमध्ये सुशांतचा फोटो आहे. २५ जुलैपूर्वीच्या सर्व पोस्ट त्याने हटवल्या आहेत. तर सुशांतच्या निधनानंतर पिठानीने त्याची आठवण म्हणून अनेक पोस्ट्स शेअर केल्या होत्या. मात्र यापैकी कोणतीही पोस्ट आता दिसत नाही. या व्यतिरिक्त त्याने त्यावर लिहिले आहे की, हे सुशांत सिंह राजपूतचे फॅन पेज आहे, तर रिया चक्रवर्तीने या अकाउंटला अनेकदा आपल्या फोटोमध्ये टॅग केले आहे. प्रश्न उद्भवतो की त्याने हे असे का केले?

रिया चक्रवर्ती आणि पिठानीची मैत्री
गेल्या काही दिवसांपासून पिठानी हेही सांगत आहे की, रिया चक्रवर्तीशी त्याची फारशी मैत्री नव्हती, पण जर रियाच्या जुन्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखत असल्याचे दिसते. रियाने अनेक वेळा तिच्या फोटोवर Photo Courtesy मध्ये पिठानीचे नाव लिहिले आहे. अलीकडेच सुशांतच्या क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ पिठानीने एक निवेदन दिले होते, ज्यामध्ये त्याने म्हटले होते की सुशांतचे कुटुंबीय त्याच्यावर रियाविरूद्ध वक्तव्य करण्यासाठी दबाव आणत आहेत.

पिठानीचे सत्य कि खोटे!
सिद्धार्थ पिठानीने माध्यमांना हेही सांगितले आहे की, सुशांत आपल्या माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूमुळे खूप अस्वस्थ झाला होता. दिशा सालियनच्या आत्महत्येची बातमी मिळताच तो चकित झाला आणि लगेचच टीव्ही ऑन केला. जेव्हा त्याला दिशाच्या मृत्यूची बातमी समजली, तेव्हा सगळा स्टाफ, त्याची बहीण आणि ते सर्व त्याच्याबरोबर होते. दिशाची माहिती मिळताच तो घाबरून गेला, त्यानंतर त्याने आणि त्याच्या बहिणीने त्याला पकडले.