Sushma Andhare-Dada Bhuse On Drug Mafia Lalit Patil | ड्रग्ज माफियावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप, ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, भुसेंसोबत कनेक्शन

मुंबई : Sushma Andhare-Dada Bhuse On Drug Mafia Lalit Patil | पुण्याच्या ससूनमधून फरार (Sasoon Hospital) झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील आणि शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यातील कनेक्शनबाबत नाना पटोले (Nana Patole), रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्यानंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ललित पाटील याला शिवसेनेत प्रवेश देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला, मात्र या फोटोत पुन्हा दादा भुसे मध्यभागी दिसत असल्याने पाटील-भुसे कनेक्शनवर शिक्कामोर्तब झाले आहे. दादा भुसे यांनीच ललित पाटीलला शिवसेनेत आणले होते असे आता अंधारे यांनी म्हटले आहे. (Sushma Andhare-Dada Bhuse On Drug Mafia Lalit Patil)

फरार ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, नाना पटोलेंनी नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन नाशिकमधील शिंदे गटातील आमदारांचा हात आहे म्हटले, काल पुण्यातील काँग्रेस आमदाराने मंत्र्याचा हात असल्याचे म्हटले होते. (Sushma Andhare-Dada Bhuse On Drug Mafia Lalit Patil)

नाशिक-शिंदे गट आणि मंत्री असे कनेक्शन येत असेल तर तिथे दादा भुसे आहेत. त्यांनी माघार घेऊ नये, चौकशी करावी असे मी म्हटले. दादा भुसे चौकशीला तयार असून गृहमंत्री काही बोलत नाहीत. इतक्या गंभीर प्रकरणावर न बोलता टोलवर विषय भरकवटतात. मी राजकीय आरोप केले नाही. दादा भुसेंना मी व्यक्तिश: भेटली नाही.

मला राजकीय फायदा घ्यायचा नाही. काही संबंध नाही. नाशिक आणि शिंदे गट असे कनेक्शन पुढे येत असेल तर नाशिकचे शिंदे गटाचे दादा भुसे आहेत. एखाद्या रुग्णाला सलग ९ महिने उपचारासाठी दाखल केले जात नाही. कुणाच्या सांगण्यावरून आरोपीला रुग्णालयात दाखल केले? याची उत्तरे समोर आली पाहिजेत, असे अंधारे म्हणाल्या.

व्हायरल फोटोबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, जो फोटो व्हायरल झाला, त्यात उद्धव ठाकरे होते. एखादी व्यक्ती ज्या जिल्ह्यातून पक्षात येते, त्या जिल्ह्यातील मोठे नेते त्यांना घेऊन येतात. ललित पाटील याला दादा भुसेंनीच मातोश्रीवर आणले होते.

अंधारे यांनी मागणी केली की, विवेक जागा ठेवत शब्दछळ न करता ससूनमधील माजी डीन, आत्ताचे डीन आणि स्टाफ
यांची चौकशी झाली पाहिजे.

नाशिक शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रविण तिदमे यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की,
दादा भुसे यांच्यावर सुषमा अंधारे यांनी जे आरोप केले, त्यात आम्ही काही फोटो माध्यमांना दिले.
त्यात ललित पाटील आणि भूषण पाटील यांचा उबाठा गटातील नेत्यांसोबत संबंध असल्याचे दिसते.
या नेत्यांची चौकशी होणे गरजेचा आहे.

प्रविण तिदमे यांनी म्हटले की, सुषमा अंधारेंनी हे फोटो पाहावेत आणि पालकमंत्री भुसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नये.
उबाठा गटाचे जे नेते आहेत त्यांचे ललित पाटील यांच्याशी संबंध काय आहेत यावर सुषमा अंधारेंनी मागणी करावी.
या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. दरम्यान, नाशिक शिवसेना शिंदे गटाने जे फोटो माध्यमांना दिले त्यात
उद्धव ठाकरे यांच्यासह दादा भुसे सुद्धा दिसत असल्याने भुसे-पाटील कनेक्शनवर शिक्कमोर्तब झाले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | बीबीएच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, कोथरुड एमआयटी मधील घटना

Shivsena MLA Disqualification Case | आमदार अपात्रतेवर एक दिवस आधीच सुनावणी, कारण सांगताना राहुल नार्वेकर म्हणाले…

Pune Cyber Crime News | सायबर गुन्हेगारांचे ‘ऑनलाइन टास्क’ पडले महागात, पुण्यातील तरुणाची आर्थिक फसवणूक

Pune Crime News | पॉर्न व्हिडिओ दाखवून 17 वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण, 23 वर्षाच्या तरुणाला अटक; कात्रज परिसरातील घटना