Sushma Andhare | सुषमा अंधारेंची तोफ धडाडली, ”देवेंद्र फडणवीसांनी माणसं घडवली नाही तर संपवली…”

भिवंडी : Sushma Andhare | बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांनी माणसं घडवली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माणसं घडवली नाही तर संपवली. त्यांनी विनोद तावडेंना संपवलं. पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) साईडलाईन केलं. एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) त्रास दिला. जे बाहेरुन घेतले होते अशांबरोबर त्यांनी काय न्याय केला? विनायक मेटेंना काय न्याय मिळाला? राजू शेट्टींबरोबर (Raju Shetty) सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) का दिसत नाहीत? याचा विचार करा, असे म्हणत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फडणवीसांवर तोफ डागली आहे.

रविवारी संध्याकाळी भिवंडी ग्रामीणमध्ये भाजपाचे अनुसूचित जमाती मोर्चाचे ठाणे जिल्हाध्यक्ष महादेव घाटाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray group) प्रवेश केला. यावेळी सुषमा अंधारे यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) म्हणाल्या, लोक उगाच म्हणतात देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत.
मात्र ही सगळी अंधश्रद्धा आहे. चाणक्य माणसं घडवणारा आहे. आपण देवेंद्र फडणवीसांना विचारलं की तुम्ही कुणाला घडवलं तर उत्तर मिळतं कुणालाच नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माणसं घडवली नाहीत. त्यांनी इकडून तिकडून सगळी भाड्याची माणसं गोळा केलीत. फडणवीस जुगाड करण्यात पटाईत आहेत, माणसं घडवण्यात नाहीत.

सुषमा अंधारे म्हणाल्या, शेतकरी कष्टाने धान्य पिकवतो. त्याच्या घरात धान्याच्या राशी लागतात.
एखाद्या रात्री त्याच्या घरी चोरी होते आणि धान्याची पोती पळवली जातात.
ते चोर पोती पळवू शकतात, धान्य पेरण्याची कला चोरु शकत नाहीत.
तुम्ही चाळीस चोरुन नेऊ शकता, मात्र ते घडवण्याची धमक देवेंद्र फडणवीसांकडे नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना