हडपसर येथे १५ कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील हडपसर भागात १५ कुत्र्यांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. एकदाच एवढ्या मोठ्या संख्येने कुत्रे दगावल्याने परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळलेल्या माहितीनुसार , हडपसर येथील म्हाडा कॉलनी जवळ १५ कुत्र्यांचे मृतदेह आढळले. एवढ्या मोठया संख्येने कुत्र्यांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी याची माहिती हडपसर पोलिसांना दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरवात केली. कुत्र्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. या कुत्र्यांना खाण्यात विष देऊन कुणीतरी जाणीवपूर्वक मारले असावे अशी लोकांमध्ये चर्चा आहे. हे सर्व भटके कुत्रे आहेत.

या घटनेमुळे पशुप्रेमी नाराज झाले आहेत. पोलिसांनीं घटनेचा पंचनामा केला असून , शविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल , यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.