‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांचा वंचित बहूजन आघाडीत प्रवेश

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ घाडगे-देशमुख, सम्राट मौर्य सेनेचे प्रदेश सचिव जावेद पटेल, श्रीमंत जाधव, बाळासाहेब तांबे यांनी वंचित बहूजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते चंदनशिवे यांनी या सर्वांचा सत्कार करून आघाडीमध्ये प्रवेश दिला.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी वंचित आघाडीच्या महिला महासचिव माजी नगरसेविका उषा शिंदे होत्या. या कार्यक्रमादम्यान साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज गरज आहे. महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीत त्यांचे मोठे कार्य आहे. सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली.

या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिरुद्ध वाघमारे यांनी केले. तर नगरसेवक गणेश पुजारी यांनी आभार मानले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like