स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्षांचा स्वयं खुशीने राजीनामा

नांदेड : पोलिसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – आज दि ०७ एप्रिल २०१९ रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंगोले यांनी राजू शेट्टी कडे आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त मिळाले आहे.

सविस्तर बातमी अशी की, इंगोले हे नांदेड जिल्ह्यातील आंदोलन कर्ते म्हणून महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहेत त्यांनी दि ०७ एप्रिल रोजी खासदार राजू शेट्टी यांना आपला राजीनामा दिला आहे गेल्या ८ वर्षा पासून प्रल्हाद इंगोले हे स्वाभीमानी शेतकरी संघटने मध्ये काम करतात ते पण जिल्हाध्यक्ष पदावर शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली,सर्व प्रकारचे आंदोलन, मोर्चे यांच्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा दरम्यान काळात संघटनेच्या नेत्याचा त्यांना खूप प्रेम व मार्गदर्शन मिळाले म्हणून त्यांनी सांगितले आहे.खास करून ऊस एफ आर पी च्या न्यायालयीन लढ्याने तर माझ्या सारख्या नवीन कार्यकर्तेस राज्यभर नवीन ओळख मिळाली असेही ते म्हणाले.

या लोकसभा निवडणुकीसाठी संघटनेची काँग्रेस सोबत युती झाली.हा निर्णय आमच्या सारख्या कार्यकर्त्याला थोडा नाराजगीचा वाटला. तरी पण संघटनेचा निर्णय म्हणून आम्ही मान्य ही केला पण नांदेडचे काँग्रेसचे उमेदवार तथा भाऊराव साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्याची देणी देण्याचे मान्य करावे.(कारखान्याकडे पैसे आता नसतील तर नंतर देण्याचे हमी घ्यावी)अशी अट घातली आहे.तो पर्यंत नांदेड जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काँग्रेसला पाठिंबा नाही असा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे असे ही बाब माझ्या काही मंडळींना आवडली नाही एफआरपी च्या न्यायालयीन लढ्यासाठी नांदेड जिल्हयातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोठया विश्वासाने मला लोकवर्गणी करून दिली त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये व माझ्या मुले माझ्या सहकार्यांना त्रास होऊ नये व संघटनेलाही बाधा येऊ नये म्हणून त्यांनी जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा जड अंतकरणाने दिला आहे.

गेल्या आठ वर्षात माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार राजू शेट्टी ,रविकांत तुपकरसह सर्वांनी मार्गदर्शन केले.तसेंच संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सहकार्याचे पुनश्च आभार मानले इंगोले म्हणाले की ,कळत नकळत माझ्याने काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा.आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत मी शेतकऱ्यांन साठी काम करणार असल्याचे निवेदन त्यांनी संस्थापक अध्यक्ष खा.राजू शेट्टी यांना दिला व त्यांचे हे पत्र सोसिल मीडिया वर व्हायरल होताच अनेक कार्यकर्ते त्यांना संपर्क करून विचारत आहेत त्यांच्या भेटी घेत असल्याचे प्राथमिक वृत्त समजले आहे.