वेगळा झेंडा – 10 कोटी लोकसंख्या ! साता समुद्रापार ‘बाबा’ नित्यानंदनं बसवलं ‘हिंदू राष्ट्र’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश सोडून पळून जाणाऱ्या ‘स्वयंभू बाबा’ नित्यानंद यांनी स्वयंघोषित हिंदू राष्ट्र बनवले आहे. अनेक दिवसांपासून नित्यानंद यांचा तपास सुरु होता. परंतु आता नित्यानंद हे हिंदू राष्ट्राचे प्रमुख असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची एक अधिकृत वेबसाइट देखील आहे. नित्यानंद यांच्या देशाचे नाव ‘कैलासा’ असे आहे. हा देश आपला अधिकार गमावलेल्या हिंदू लोकांसाठी असल्याचे वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.

अलग झंडा-करोड़ों की आबादी: सात समंदर पार नित्यानंद ने बसाया 'हिंदू राष्ट्र'

बाबा नित्यानंद यांच्यावर कर्नाटकात अपहरण आणि दुष्कृत्य केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर गुजरातमध्ये देखील लैंगिक छळ केल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. 22 नोव्हेंबरला गुजरात पोलिसांनी नित्यानंद यांच्या आश्रमाची झडती घेतली होती.

नित्यानंद यांचा कैलासा हा देश नेमका कोठे आहे हे जरी अद्याप कोणाला माहिती नसले तरी वेबसाइटवर याबाबतची महत्वाची माहिती दिली आहे. या राष्ट्राचा हेतू हिंदू धर्माचे रक्षण करणे आणि मानवते प्रती लोकांना जागरूक करणे हा आहे असे त्यांच्या वेबसाइटवर सांगण्यात आले आहे. नित्यानंद यांच्या देशाचा वेगळा झेंडा, पासपोर्ट, शाळा, सरकारी विभाग, भाषा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत.

वेबसाइटवरील माहितीनुसार या देशाची एकूण लोकसंख्या 10 कोटी आहे. इंग्रजी, संस्कृत आणि तमिळ या देशाची भाषा आहे. या देशाच्या झेंड्याचे नाव ‘ऋषभ’ आहे. त्रिकोणी आकाराच्या या झेंड्यावर शंकर आणि नंदी बैलाचे चित्र आहे. यावरील शिवाला 25 शीर आणि 50 हाथ असल्याचे दिसून येते. डोक्यावर असलेला चंद्र आणि गळ्यातील माळेमुळे हा जणू शंकराचाच अवतार असल्यासारखे वाटत आहे.

वेबसाइटवर राष्ट्रीय प्राणी म्हणून नंदी बैलाचा उल्लेख आहे तसेच त्या ठिकाणी नंदीचा एक फोटो देखील उपलोड केला गेला आहे. राष्ट्रीय फुल म्हणून कमळ लिहिण्यात आले आहे. वडाचे झाड हे या देशातील राष्ट्रीय वृक्ष तर चार पाय असलेल्या एका सुवर्ण पक्षाला हा देश आपला राष्ट्रीय पक्षी मानतो.

Visit : Policenama.com