‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीने केली अभिनंदन यांची चेष्ठा  

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय वायुसेनेने गेल्या मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली होती. त्यामुळे भारत-पाकिस्तानच्‍या दरम्‍यान तणावाचे वातावरण आहे. भारतीय विंग कमांडर पाकिस्तानच्‍या ताब्‍यात आहे. या सर्व घडामोडीनंतर विंग कमांडर अभिनंदन उद्या (दि. १ मार्च) मायदेशी परतणार आहेत. दरम्‍यान, पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने विंग कमांडर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून विनोद केला आहे. वीनाच्‍या या ट्विटरनंतर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने तिला सडेतोड उत्तर दिले आहे.
वीना मलिकने विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो शेअर करत लिहिले आहे, ‘अभी-अभी तो आये हो. अच्छी मेहमान नवाजी हो गई आपकी.
या ट्विटनंतर स्वरा भास्करने प्रत्‍युत्तर दिले आहे. स्‍वराने आपल्‍या ट्‍विटमध्‍ये म्हटले आहे  -‘वीनाजी आपणास आपल्‍या या छोट्याश्या विचारांवर लाज वाटायला हवी. तुझा हा आनंद खूपच निर्लज्ज आहे. तुमच्‍या ताब्‍यात जो आमचा जवान आहे. तो एक हिरो आहे आणि धाडसी आहे. त्‍यामुळे त्‍यांचा सन्‍मान होत आहे.’

वीना मलिकने अभिनंदन यांची चेष्‍टा केली आहे. वीना मलिकने लिहिलयं- ‘सर्व काही सोडून द्या. मी कधी अशा मिशा पाहिल्‍या नाहीत. ‘वीना मलिकचे नाव या आधीही अनेकदा चर्चेत आले आहे. ती आपल्‍या वादग्रस्‍त विधानांमुळे अनेकवेळा ट्रोल झाली आहे. वीना मलिक बिग बॉसच्‍या पाचव्‍या सीझनमध्‍ये सहभागी झाली होती.