इंदापूर पंचायत समिती सभापतीपदी हर्षवर्धन पाटील गटाच्या स्वातीताई शेंडे यांची निवड  

इंदापूर – इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी मंगळवारी (दि.20) रोजी पंचायत समीती अल्पबचत सभागृृृृहामध्ये झालेल्या निवडणुकीत काटी गणातील सदस्या स्वातीताई बापूराव शेंडे (रा.वरकुटे खुर्द) या विजयी झाल्या असुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शितल वणवे यांचा ८ विरूद्ध ५ अशा फरकाने विजयी मिळवुन पुन्हा एकदा इंदापूर पंचायत समीतीवर हर्षवर्धन पाटील गटाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे.

इंदापूर पंचायत समीतीच्या विद्यमान सभापती पुष्पा रेडके यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. यावेळी सत्तारूढ बाजूकडून सभापती पदासाठी स्वाती शेंडे यांनी तर विरोधी राष्ट्रवादीकडून शेटफळगढे गणाच्या सदस्या शीतल वनवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत स्वातीताई शेंडे यांना 8 मते मीळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल वनवे यांना 5 मते मिळाल्याने सभापतीपदी स्वातीताई शेंडे यांची बहुमताने निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा बारामती (महसुल) उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी घोषित केले

या वेळी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्यमंत्री मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच माजी सभापती पुष्पा रेडके यांचाही उत्कृष्ट कामकाजाबद्दल हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की माजी सभापती पुष्पा रेडके यांनी त्यांचे काळात चांगले काम केले आहे. कोरोना काळात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांनी सामान्य माणसाच्या हिताचे काम करावे असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

नवनियुक्त सभापती स्वाती शेंडे यांनी नागरीकांना पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी माजी सभापती करणसिह घोलप व सदस्य हेमंत नरूटे यांनी मनोगत व्यक्त केले.

निवडणूक अधिकारी म्हणून बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी काम पाहिले.यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.शरद जामदार, उदयसिह पाटील, मयुरसिह पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उपसभापती संजय देहाडे, मोहन दुधाळ, देवराज जाधव, कैलास कदम, पंचायत समितीचे सर्व सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.