’या’ आजारामुळे पोटाच्या खालच्या बाजूला दुखतं ? जाणून घ्या 6 लक्षणं आणि उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – काही आजारांची लक्षणे ओळखता आली तर वेळीच उपचार करून ते दूर करता येऊ शकतात. यापैकीच एक आजार म्हणजे हर्निया होय. महिला तसेच पुरूष दोघांनाही हा आजार होऊ शकतो. या आजरात शरीरातील मासपेशी किंवा टिश्यू बाहेर येऊ लागतात. शरीराचा एखादा भाग जर सामान्यापेक्षा अधिक वाढला तर त्यास हर्निया म्हणतात. हनिर्याची लक्षणं पोटात दिसतात. बेबी, कंबर आणि आसपासच्या भागात ही समस्या होते. या आजाराची कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घेवूयात…

ही आहेत कारणं

1 व्यायाम किंवा जास्त जड वजन उचलणे
2 लठ्ठपणा असणे
3 जन्मजात समस्या असणे
4 वाढते वय
5 जखम किंवा सर्जरीमुळे

ही आहेत लक्षणे
1 पोटाच्या खालच्या बाजूला गाठ येते
2 खोकताना, वाकताना, जास्त वेदना होणे
3 छातीत जळजळ
4 अन्न गिळण्यासाठी त्रास
5 सूज आलेल्या जागेवर तीव्र वेदना
6 लघवी करताना वेदना

अशी घ्या काळजी
1 आरामदायक अंडरगारमेंट वापरा.
2 पोटाच्या मांसपेशींवर जास्त दबाव टाकणारी कामं करु नका.
3 पोट आणि अपचन समस्या वाढल्यास डॉक्टरांकडे जा.
4 वजन वाढू देऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
6 प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचे सेवन करा.