T20 World Cup 2022 | भारतासह ‘हे’ तीन संघ असणार सेमीफायलनमध्ये, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वर्तवलं भविष्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी टी20 विश्वचषक 2022 ( T-20 World Cup) मध्ये मोठी रंगत पाहायला मिळणार आहे. यंदा सर्वच संघ कमाल फॉर्मात असल्याने यंदाचा वर्ल्डकप (T20 World Cup 2022) अटीतटीचा होणार आहे. या वर्ल्डकपमध्ये नेमके कोणते संघ सेमीफायलनपर्यंत पोहोचणार याबद्दल माजी क्रिकेटर आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी एक भाकीत केले आहे. शास्त्रींच्या मते भारत यंदा दमदार फॉर्ममध्ये असल्याने भारत (India) सेमीफायनल पर्यंत नक्कीच धडक मारू शकतो. याचबरोबर पाकिस्तान (Pakistan) , ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) हे संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचू शकतात. तसंच न्यूझीलंड (New Zealand) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) हे संघही कमाल फॉर्ममध्ये असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे.

 

‘पंत, पांड्या आणि कार्तिकमुळे भारताची ताकद वाढली’
भारतीय संघाची यंदाची बॅटिंग लाईनअप ही विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात ताकदवर बॅटिंग लाईनअप असल्याचे रवी शास्त्री यावेळी म्हणाले. यामागील खास कारण म्हणजे, मधल्या फळीतील पंत (Rishabh Pant), पांड्या (Hardik Pandya) आणि कार्तिक (Dinesh Karthik) हे त्रिकुट आहे. या तिघांच्या संघात एकत्र असण्याने भारताची फलंदाजी आणखी दमदार झाली आहे. त्यामुळे भारत या विश्वचषकात चांगली कामगिरी करेल.

कोणत्या शहरांत रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
16 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे.
13 नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत.
हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या सात शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.
यामध्ये अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या शहरांचा समावेश आहे.
उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील.
तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | india pakistan australia and england will be in semi final of t20 world cup 2022 says ravi shastri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत; ‘मशाल चिन्ह मिरवून झाल्यावर …’ नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल

Eknath Khadse | विरोधी पक्ष विखुरलेले राहावेत, तसं भाजपचं कारस्थान असू शकतं, एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली शंका

Pune Motor Driving School | महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन