T20 World Cup 2022 | टी20 वर्ल्ड कपमध्ये ‘या’ 5 स्पिनर्सची चालणार जादू, तुमचा आवडता स्पिनर्स आहे का या यादीमध्ये?

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आजपासून ऑस्ट्रेलियामध्ये टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2022) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत फलंदाजापेक्षा गोलंदाजांचा बोलबाला जास्त राहणार आहे. ऑस्ट्रेलियाची मैदाने फास्ट बॉलरला साथ देत असताना त्या मैदानावर स्पिनर्स कशा प्रकारे कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा स्पिनर्सबद्दल त्यांचा या स्पर्धेत बोलबाला राहणार आहे. (T20 World Cup 2022)

 

1) या लिस्टमध्ये सर्वात पहिले नाव येते ते श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाचं (Wanindu Hasaranga). त्याची गोलंदाजी खेळणं अनेक फलंदाजांसाठी कठीण ठरु शकतं. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्ये हसरंगाच्या बॉलिंग जादू आपण पाहिलीच असेल. हसरंगानं श्रीलंकेकडून टी20 आंतरराष्ट्रीय (T20 World Cup 2022) क्रिकेटमध्ये आतापर्यंत 44 मॅचमध्ये 71 विकेट घेतल्या आहेत.

 

2) या यादीत दुसरा क्रमांक लागतो तो अफगाणिस्तानच्या रशिद खानचा (Rashid Khan). रशिद खान सध्या जगातल्या सर्वात यशस्वी स्पिनर्सपैकी एक आहे. त्यानं याआधी ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत अनेक सामने खेळले आहेत. या अनुभवाचा राशिदला नक्कीच फायदा होईल. रशिदच्या नावावर आतापर्यंत 71 टी20I मध्ये 118 विकेट्स जमा आहेत.

 

3) या यादीत तिसरा क्रमांक लागतो तो ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडम झॅम्पाचा (Adam Zampa).
घरच्या मैदानावर खेळणारा झॅम्पा यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धोकादायक ठरू शकतो.

4) या यादीत चौथ्या क्रमांकावर येतो टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal).
2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चहलला वर्ल्ड कप संघातून डावलण्याची चूक भारताने मात्र यंदा चहलवर टीम इंडियाची मोठी मदार राहिल.
टी20 त चहलची बॉलिंग खेळणे हे भल्या भल्यांसाठी आव्हानात्मक आहे. चहलनं आतापर्यंत 69 मॅचमध्ये 85 विकेट्स घेतल्या आहेत.

 

5) पाचव्या नंबरवर आहे पाकिस्तानचा शादाब खान (Shadab Khan). शादाब खाननं गेल्या काही वर्षात टी20 क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे.
त्याने 77 सामन्यात शादाबनं 87 विकेट्स घेतल्या आहेत.

 

Web Title :- T20 World Cup 2022 | list of top 5 spinners who are ready to surprise in upcoming t20 world cup sport news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिंदेचा वापर शिवसनेविरूद्ध ’कॉन्ट्रॅक्ट किलर’ प्रमाणे, त्यांच्या अधःपतनाची ही सुरुवात, कुठेतरी ब्रेक लावायला हवा

MNS Sandeep Deshpande | मनसेचा शिवसेनेवर प्रश्नांचा भडीमार, सहानुभूतीवर मतं मागू नका, कामांच्या मुद्द्यावर मागा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भाजपला इशारा, म्हणाले-‘हीच शिवसेना आणि मशाल तुम्हाला…’