T20 World Cup 2022 | विराट कोहलीने रचला विराट विक्रम! श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेला मागे सोडत रचला विश्वविक्रम

ॲडलेड : वृत्तसंस्था – T20 World Cup 2022 | आज ऑस्ट्रेलियातील (Australia) ॲडलेड (Adelaide) या ठिकाणी भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात सामना खेळवला जात आहे. या विश्वचषकात टीम इंडिया तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराजयासह चार पॉइंटससह दुसऱ्या स्थानावर आहे. बांग्लादेशचेही चार पॉइंटस आहेत. पण नेट रनरेटमध्ये (Run Rate) भारत बांगलादेशपेक्षा पुढे आहे. यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही टीम (T20 World Cup 2022) जोरदार प्रयत्न करणार हे मात्र नक्की.

विराटचा विराट विक्रम
आजच्या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) आपला फॉर्म कायम ठेवत पुन्हा एकदा अर्धशतकीय पारी खेळली आहे. या सामन्यात विराटने नाबाद 64 धावा केल्या आहेत. यामध्ये 8 चौकार आणि 1 षटकार यांचा समावेश आहे. या खेळीबरोबर विराट कोहलीने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम श्रीलंकेचा (Sri Lanka) माजी कर्णधार महेला जयवर्धने (Mahela Jayavardhan) याच्या नावावर होता. मागच्या 8 वर्षांपासून एकही खेळाडू त्याचा हा विक्रम मोडू शकला नाही. मात्र किंग कोहलीने हा विक्रम मोडत एक नवा विक्रम स्थापन केला आहे. विराट कोहलीने महेला जयवर्धनेच्या 1016 धावांचा आकडा पार केला आहे. या सामन्यात विराट बरोबर भारताचा उपकर्णधार लोकेश राहुल (Lokesh Rahul) यानेदेखील आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. (T20 World Cup 2022)

रोहित शर्मालाही विक्रम करण्याची संधी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील जुनी लय पकडली आहे.
पाकिस्तानविरूद्ध (Pakistan) स्वस्तात माघारी परतल्यानंतर रोहितने नेदरलॅंड्सविरूद्ध अर्धशतकी खेळी करून पुनरागमन केले.
आताच्या घडीला विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत विराट कोहली पहिल्या आणि रोहित शर्मा चौथ्या स्थानी आहे. ख्रिस गेल (Chris Gayle) 965 धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
रोहित शर्मा 921 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
त्यामुळे रोहित शर्मादेखील इतिहास रचणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title :-  T20 World Cup 2022 | virat kohli becomes the leading run scorer overtakes sri lanka legends mahela jayawardene in the history of t20 world cup

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bigg Boss Marathi 4 | बिग बॉसच्या घरात होणार तुफान राडा!

Priyanka Chopra | भारतात येताच प्रियंकाने मोरबी दुर्घटनेवर शेअर केली पोस्ट, म्हणाली कि….

Chandrashekhar Bawankule | राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा, म्हणाले- ‘यापुढे खोटारडेपणा केला, तर…’