T20 World Cup नंतर ‘हा’ खेळाडू घेणार टीम इंडियातून निवृत्ती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) ऑस्ट्रेलियामध्ये (Austrelia) खेळवण्यात येणार आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) मागच्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी करत आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) एका खेळाडूसाठी शेवटचा विश्वचषक असणार आहे. तो या टी-20 विश्वचषकानंतर निवृत्तीची (Retirement) घोषणा करू शकतो. तो खेळाडू कोण आहे चला जाणून घेऊया…

 

हा खेळाडू टी-20 विश्वचषकनंतर घेऊ शकतो निवृत्ती
या खेळाडूचे नाव आहे दिनेश कार्तिक (Dinesh Kartik). दिनेश कार्तिकने 2007 साली एमएस धोनीच्या (M.S.Dhoni) नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या T20 संघाचा भाग होता. यानंतर त्याने जवळजवळ 15 वर्षांनंतर T20 संघात पुनरागमन केले आहे. कार्तिकने आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्यामुळे याच कामगिरीच्या जोरावर त्याला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. तेव्हापासून दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी फिनिशरची भूमिका पार पाडत आहे.

 

ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकमध्ये चुरस
दिनेश कार्तिक हा भारतीय संघातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आहे. तीन वर्षांनंतर तो टीम इंडियात परतला आहे. त्याचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. टीम इंडियाने 2022 च्या टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेचे जेतेपद पटकावावे अशी त्याची इच्छा आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात चुरस असते. या स्पर्धेनंतर दिनेश कार्तिक निवृत्तीची घोषणा करू शकतो.

 

T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग
दिनेश कार्तिक 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.
कार्तिक भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे.
त्याने भारतासाठी 26 कसोटी सामन्यांमध्ये 1026 धावा, 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा आणि 51 टी-20 सामन्यात 598 धावा केल्या आहेत.
यामध्ये त्याने फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे.

आयपीएलमध्ये सरस कामगिरी
आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकने उत्तम कामगिरी केल्यामुळे त्याचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाले आहे.
कार्तिकने मागच्या काही दिवसात भारतीय संघासाठी फिनिशरची (Finisher) भूमिका बजावली आहे.
टीम इंडियामध्ये परतल्यानंतर दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिले अर्धशतक झळकावले होते.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup 2022 dinesh karthik may play last world cup finisher wicketkeeper Sport News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Women Asia Cup 2022 | आजपासून रंगणार महिला आशिया चषकाचा थरार; इंडिया वि. श्रीलंका होणार पहिली लढत

Eng vs Pak | इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात बॉल लागल्यामुळे भर मैदानात कळवळला अम्पायर, Video आला समोर

World Table Tennis Championships | जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, उझबेकिस्तानचा केला पराभव