T20 World Cup | पाकिस्तानचा आफ्रिकेवर मोठा विजय ! सेमी फायनलची रंगत अजून वाढली

सिडनी : वृत्तसंस्था – टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) सेमी फायनलची रेस आणखी रोमांचक झाली आहे. पाकिस्तानने (Pakistan) दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) विजय मिळवल्यामुळे आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे, तसंच सेमी फायनलच्या रेसमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे पाकिस्तान सेमी फायनलच्या शर्यतीत अजून आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर 33 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत पावसाने दक्षिण आफ्रिकेचा घात केला. (T20 World Cup)

 

टीम इंडियासाठी सेमी फायनलचं समिकरण
भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना झिम्बाब्वेविरुद्धचा (Zimbabwe) अखेरचा सामना जिंकणं गरजेचं आहे. या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला, तर ते दुसऱ्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर राहतील आणि सेमी फायनलमध्ये पोहोचतील, पण झिम्बाब्वेने टीम इंडियाचा पराभव केला तर भारताला सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बांगलादेशने (Bangladesh) पाकिस्तानला किंवा नेदरलँड्सने (Netherlands) दक्षिण आफ्रिकेला हरवावे लागेल.

 

भारतासाठी करो या मरो सामना
भारतासाठी झिम्बाब्वेविरुद्धचा सामना करो वा मरो असाच असणार आहे. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकून टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहू शकते, अन्यथा सेमी फायनलला जाण्यासाठी त्यांना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे. (T20 World Cup)

भारतासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंड/ऑस्ट्रेलियाचे आव्हान
आफ्रिका अखेरच्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवून 7 गुणांसह उपांत्य फेरीत जाईल.
भारत झिम्बाब्वेविरुद्धची अखेरची लढत जिंकून 8 गुणांसह टॉपवर राहील.
अशा परिस्थितीत भारताचा सामना ग्रुप 1 मधून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड (England)
किंवा ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यापैकी एकाबरोबर होईल.

 

Web Title :- T20 World Cup | t20 world cup pak vs sa pakistan beat south africa by 33 dls runs the chances of india vs englandaustralia semi final increases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA एरियरबाबत आली मोठी माहिती

Central Government Employees News | सरकारी कर्मचार्‍यांसाठी IMP बातमी; GPF चा नियम बदलला, जाणून घ्या

Maharashtra Revenue And Forest Department Officers Transfer | अपर जिल्हाधिकारी संवर्गातील 8 अधिकार्‍यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्त्या