PHOTOS : तापसीनं सुरू केलं ‘थप्पड’चं प्रमोशन, वेस्टर्न लूकमध्ये दिसली एकदमच ‘गॉर्जियस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारी अभिनेत्री तापसी पन्नूचा यावर्षीच्या चित्रपटाच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. लवकरच ही अभिनेत्री चित्रपट ‘थप्पड’ मध्ये दिसणार आहे. अलीकडेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते, याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पोस्टर रिलीज होताच, तापसीने चित्रपटाची जाहिरात करण्यासही सुरुवात केली आहे. फोटोमध्ये दिसत आहे की तापसी कशाप्रकारे आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

 

शुक्रवारी, तापसीला चित्रपटाचे प्रमोशन करताना पाहिले गेले. यावेळी अभिनेत्रीचा खूपच सुंदर लूक पहायला मिळाला. तिच्या लूकबद्दल बोलायचे म्हणले तर, तापसीने व्हाईट टॉप, साइड कट चेक स्कर्टसह टीम-अप केले होते.

अभिनेत्री तापसीने कमरेवर बेल्ट बांधलेला होता त्याचबरोबर हलका मेकअप, व्हाइट इयररिंग्ज आणि स्टायलिश हेअरस्टाईल अभिनेत्रीच्या लूकमध्ये आणखी भर घालत होता. फोटोमध्ये तिने खूपच स्टाइलिश अंदाजात पोज दिलेले दिसत आहे.

तिच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर अनुभव सिन्हा यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेला चित्रपट ‘थप्पड’ मध्ये तापसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.