‘स्टुडेंट ऑफ द ईयर १० मध्ये तैमूरला कास्ट करू’ : ‘या’ दिग्दर्शकाचे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा लाडका आणि बॉलिवूड स्टार किड तैमूर अली खान नेहमीच चर्चेत असतो. सैफ आणि करीनापेक्षाही तैमूर जास्त लाईम लाईटमध्ये दिसतो. तैमूर अर्थात छोट्या नवाबची लोकप्रियता इतकी आहे की, तैमूरच्या नावाने बाजारात कुकीज आणि खेळणीही पाहायला मिळत आहेत. तैमूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. अशातच आता स्टुडेंट ऑफ ईयर १० मध्ये तैमूरच्या कास्टींगला घेऊन अनेक चर्चा समोर आल्या आहेत.

खरंतर दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा यांचं म्हणणं आहे की, ते तैमूरला स्टुडेंट ऑफ द ईयर १० मध्ये कास्ट करणार आहेत. स्टुडेंट ऑफ द ईयर २ च्या प्रमोशनल मध्ये पुनीत मल्होत्रा यांनी गंमतीशीर अंदाजात म्हटले की, तैमूर या फ्रेंचाइजीच्या १० व्या सिरीजमध्ये असेल. जर आम्ही स्टुडेंट ऑफ द ईयर १० बनवला तर तैमूर नक्कीच यााचा हिस्सा असेल.” असे पुनीत मल्होत्रा म्हणाले. शिवाय काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती डायरेक्टर मधुर भंडारकर तैमूरवर सिनेमा बनवणार आहे. परंतु मधुर भंडारकर यांनी हे वृत्त खोटं असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, तैमूरच्या सततच्या वाढणाऱ्या सोशल मीडिया फॉलोविंगमुळे करीनाने एका मुलाखतीत चिंता व्यक्त केली आहे. सततचे माध्यमांचे मिळणारे अटेंशन हे तैमूरसाठी खतरनाक आहे असेही करीना म्हणाली.