Coronavirus : तामिळनाडूमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार ! 15 दिवसात 2500 हून 10 हजार झाली रूग्ण संख्या, देशात नंबर 2 वर

ADV

चेन्नई : वृत्त संस्था  – देशात कोरोना बाधितांची संख्या ८६ हजारांपर्यंत पोहचली असतानाच रुग्ण वाढीचा दर तामिळनाडुत सर्वाधिक आढळून येत आहे. महाराष्ट्र आणि मुंबई खालोखाल तामिळनाडुमध्ये कोरोना बाधितांचे रुग्ण आढळून येत आहे. काही दिवसापूर्वी चार क्रमांकावर असलेले हे राज्य आता देशात कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत दुसर्‍या क्रमांकावर आले आहे.

महाराष्ट्रात जशी सर्वाधिक बाधित मुंबई आहे. त्याच प्रमाणे तामिळनाडुमध्ये चेन्नई हे राजधानीचे शहर कोरोनाग्रस्त आहे. राज्यातील एकूण कोनोरा बाधितांपैकी निम्म्यांहून अधिक कोरोना बाधित हे चेन्नईत आहेत.

तामिळनाडुमध्ये ७ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित आढळून आला होता. तो ओमानहून परत आला होता. त्यानंतर तब्बल १८ मार्च रोजी दुसरा रुग्ण आढळून आला होता. तो दिल्लीहून चेन्नईला आला होता. मात्र, त्याचा कोणताही परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता.

तामिळनाडुमध्ये १ मे रोजी २ हजार ५२६ रुग्ण होते. ७ मे रोजी ही संख्या दुप्पट होऊन ५ हजार ४०९ झाली. आणि १५ मे रोजी ही संख्या पुन्हा दुप्पट होऊन १० हजार १०८ इतकी झाली आहे. चेन्नईत आतापर्यंत एकूण ५ हजार ९४६ कोरोना बाधित आहेत. तामिळनाडुत आतापर्यंत ७१ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

तामिळनाडुची वाढती कोरोना बाधितांची संख्या
१ मे २५२६
२ मे २७५७
३ मे ३०२३
७ मे ५४०९
१० मे ७२०४
११ मे ८००२
१३ मे ९२२७
१४ मे ९६७४
१५ मे १०१०८