अजय देवगणचा ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ आणि दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ची एकाच दिवशी ‘टक्कर’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजय देवगन आणि सैफ अली खानचा नवा सिनेमा ‘तानाजी द अनसंग वॉरियर’चा नवा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमातून अजय देवगन आणि सैफची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या पोस्टरमध्ये दोन्ही कलाकार अत्यंत खतरनाक लूकमध्ये दिसत आहेत.

अजय देवगनने आपल्या इंस्टाग्रामवर तानाजी द अनसंग वॉरियरचे दोन नवे पोस्टर शेअर केले. यात तो मावळ्याच्या लाल रंगाच्या पगडीत दिसत आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत कॅप्शन दिले की खबरदार.. तो तलवारी पेक्षा जास्त धारदार आहे. दुसऱ्या एका पोस्टरमध्ये सैफ हस्ताना दिसत आहे. त्या खाली कॅप्शन दिला आहे की कदाचित जखम तलवारीच्या धारेपेक्षा जास्त खोल असेल.

या सिनेमामध्ये अजय देवगन तानाजी मालुसरेच्या मुख्य भूमिकेत आहेत. या सैफ आणि काजलची देखील महत्वाची भूमिका आहे. हा सिनेमा अजय देवगन फिल्म्स आणि टी – सीरीज प्रोड्यूसने प्रोड्यूस केला आहे. हा सिनेमा 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 10 जानेवारी 2020 ला दिपिका पादुकोणचा स्टार छप्पक देखील रिलीज होईल.

या आधी या सिनेमातून दिसले सैफ-अजय दिसले एकत्र –

अजय देवगण आणि सैफने या आधी कच्चे धागे, एलओसी कारगिल आणि ओमकारा या सिनेमात समोर दिसले होते. कच्चे धागे आणि ओमकारा सिनेमातील दोघांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले होते. तानाजी या सिनेमा बरोबर अजय देवगन मैदान या बायोपिकमध्ये देखील काम करत आहे, हा सिनेमा ऐतिहासिक फुटबॉल प्लेअर सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित असेल.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like