‘दुष्काळाच्या काळात चारा आणि टँकर घोटाळा’, रोहित पवारांचा भाजपवर ‘घणाघात’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी जिल्हा नियोजन बैठकीत बोलत असताना भाजपवर निशाणा साधला आहे. दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टँकर घोटाळा झाला आहे. तर चारा छावण्यातही घोटाळा झाला असून तत्कालीन राज्य सरकारनं जलयुक्त शिवार योजना राबवली होती त्यातही घोटाळा झाला आहे असा घणाघाती आरोप रोहित पवार यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ नगरला आले होते. त्यांच्या उपस्थिती जिल्हा नियोजनाची बैठक झाली.

जिल्हा नियोजन बैठकीत बोलताना रोहित पवार यांनी तत्कालीन भाजप सरकारवर घणाघाती आरोप केले. अहमदनगर जिल्ह्यातील रस्ते, शाळा या विषयावर मोठा निधी मागितला आहे. दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात टँकर छावणी आणि दिलीप पवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.

हसन मुश्रीफ यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं आहे की, “राष्ट्रवादीच्या बैठकीत नवीन सदस्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्यात प्रामुख्यानं जलयुक्त शिवार, टँकर घोटाळा आणि चारा छावण्या या तिन्ही विषयांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो शासनाला पाठवण्यात येईल, याची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे.” असंही त्यांनी सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा –