‘बुरखा’ घालण्यावरून ‘लेखिका’ तस्लीमा नसरीनला ‘भिडली’ ‘गायक’ AR रहमानची मुलगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमानची मुलगी खतिजा रहमान आणि लेखिका तस्लीमा नसरीन यांच्यात बुरख्याच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर वॉर सुरू झालं आहे. नसरीनं खतिजाच्या बुरखा घालण्यावर आक्षेप घेतला होता. यावर आता खतिजानं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाली तस्लीमा नसरीन ?
काही दिवसांपूर्वी तस्लीमा नसरीननं ए आर रहमानच्या मुलीचा(खतिजाचा) बुरखा घातलेला फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताना तस्लीमानं म्हटलं होतं की, “मला रहमानचं संगीत खूप आवडतं. परंतु जेव्हा मी त्यांच्या मुलीला पहाते तेव्हा मला गुदमरल्यासारखं होतं. मला वाईट वाटतं की, एका सांस्कृतिक कुटुंबातील शिकलेल्या महिलेचाही सहज ब्रेन वॉश केला जाऊ शकतो.”

खतिजानं दिलं जोरदार प्रत्युत्तर
यानंतर आता खतिजा रहमाननं तस्लीमा नसरीनला इंस्टाग्रामवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. खतिजाची इंस्टाग्रामवर मोठी फॅन फॉलोविंग आहे. खदीनानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “तस्लीमा मला वाईट वाटतं की, जगात एवढं सगळं आहे परंतु तुम्हाला माझ्या कपड्यांमुळं गुदमरल्या सारखं होत आहे. तुम्ही थोडी फ्रेश हवा घ्या. मला काहीही गुदमरल्यासारखं होत नाही. मी ज्या गोष्टीचं समर्थन करत आहे मला त्याचा अभिमान आहे. मला जास्त एनर्जेटीक वाटतं.”

‘हे फेमिनिजम नाही’
आपल्या पोस्टमध्ये खतिजा पुढे म्हणते, “तुम्ही कृपया गुगलवर फेमिनिजमचा अर्थ नक्की पहा. कारण इतर महिलांना नीचा दाखवणं किवा एखाद्याच्या वडिलांना अशा विषयांमध्ये ओढणं फेमिनिजम नसतं. तसं मला तर आठवतही नाही की, मी माझा फोटो तुमच्याकडे तपासणीसाठी कधी पाठवला होता ते.”