चीनमुळं तुटलं होतं रतन टाटांचं ‘लग्न’ ! व्हेलेंटाइन डे पूर्वी स्वतः सांगितली आपली ‘प्रेम’ कहाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांनी व्हेलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लव्ह स्टोरी बाबत सांगितले की पदवीनंतर लॉस एंजेलिसमध्ये काम करताना त्यांचा विवाह होता होता राहीला. रतन टाटा यांनी आपले जीवन, आई वडीलांचा घटस्फोट, आजी सोबत घालवलेले दिवस, त्यांच्यांकडून मिळालेले उत्तम संस्कार, कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण, प्रेम आणि ते नाते का संपले याबाबत देखील अनेक मुद्यांवर एका मुलाखतीत बातचीत केली.

रतन टाटा यांची लव्ह स्टोरी –
एका मुलाखतीत उद्योगपती आणि टाटा समूहाचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा म्हणाले की आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांचे वडील नाराज झाले, त्यामुळे रतन टाटा लॉस एंजेलिसमध्ये नोकरी करु लागले.

तेथे त्यांनी दोन वर्ष काम केले. यावर बोलताना आठवणीत रतन टाटा म्हणाले की ते वेळ अत्यंत सुंदर होती, वातावरण एकदम खास होते. माझ्याकडे माझी गाडी होती आणि मला माझ्या नोकरीवर प्रेम होते. लॉस एंजेलिसमध्ये रतन टाटा प्रेमात पडले आणि ते एका तरुणींशी विवाह करणारच होते. परंतु त्यांना अचानक भारतात यावे लागेल कारण त्यांच्या आजीची प्रकृती चिंताजनक होती.

रतन टाटांना वाटले होते की ते ज्या तरुणीवर प्रेम करत होते ती लग्नानंतर भारतात येईल. परंतु 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे तिचे आई वडील तिला भारतात जाऊ देत नव्हते आणि त्यांचे नाते तुटले.

रतन टाटा यांचे बालपण –
आपल्या बालपणाबद्दल रतन टाटा म्हणाले की त्यांचे बालपण आनंदात गेले परंतु आई-वडील वेगळे झाल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या भावंडांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ते म्हणाले की मला आज देखील आठवते की दुसऱ्या विश्व युद्धानंतर मला आणि माझ्या भावांना उन्हाळ्यात सुट्ट्यांसाठी आजी लंडनला घेऊन गेली होती. तिनेच आम्हाला आमच्या जीवन मुल्यांबाबत शिकवण दिली.