कारमध्ये विद्यार्थ्यांशी ‘संबंध’ ठेवत होती महिला शिक्षक, न्यायालयानं सुनावली ‘ही’ भयानक शिक्षा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विद्यार्थ्यांशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका महिला शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी २९ वर्षीय शिक्षक ब्रेंडी लिनला अटक केली. तिच्यावर १६ आणि १८ वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांशी संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण अमेरिकेतील ओकलाहोमा येथून समोर आले आहे.

आरोपी शिक्षक आणि चीअरलीडिंग कोच ओकलाहोमा येथील सॅलेसो येथे सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये शिकवत असत. मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकेने विद्यार्थ्यांशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. तिने तिच्या कारमध्ये विद्यार्थ्यांशी शारीरिक संबंध ठेवत होती.

teacher

दरम्यान, एक अज्ञात व्यक्तीने राज्य शिक्षण मंडळाला बोलावून विद्यार्थ्यांसह होणाऱ्या अयोग्य संबंधांची माहिती दिली तेव्हा पोलिसांना शिक्षकांच्या दुष्कर्मांची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी १६ आणि १८ वर्षाच्या २ मुलांची चौकशी केली. विद्यार्थ्यांनी सांगितले की, २०१७ ते २०१९ दरम्यान त्यांनी शिक्षकांशी अनेक वेळा शारीरिक संबंध बनविले.

सुरुवातीला शिक्षक विद्यार्थ्यांसमवेत स्नॅपचॅटवर बोलत असत. त्याने अ‍ॅपवर नग्न फोटोही शेअर केले आहेत. १८ वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले की, शिक्षिकेने त्याच्याशी कारमध्ये संबंध ठेवले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शिक्षिकेला शाळेतून काढण्यात आले. दोषी ठरल्यास त्यांना १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/