शिक्षक बनला भक्षक ! ‘डान्स’ शिकणाऱ्या ‘मुली’च्या शीत पेयात ‘गुंगीचं’ औषध टाकून केलं ‘घाण’ कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाने मुलीला नशेचे पेय पाजून व्हिडिओ तयार केला आणि त्यानंतर मुलीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरु केला. ब्लॅकमेल करुन या मुलीकडून त्याने दागिणे आणि दीड लाख रुपये वसूल केले. पोलिसांनी आता या शिक्षकाला ताब्यात घेतले आहे, हे प्रकरण राजस्थानच्या पालीचे आहे.

पीडित मुलगी 10 वीला आहे. तिच्या शाळेतील एक शिक्षक डान्स शिकवण्याबरोबर आपली अ‍ॅकेडमी देखील चालवत होता. ऑगस्ट महिन्यात त्याने एक दिवस मुलीला डान्स शिकवण्याचा बहाण्याने आपल्या अ‍ॅकेडमीमध्ये बोलावले.

यावेळी शिक्षकाने मुलीला शीत पेयात नशेचे औषध टाकून पाजले. बेशुद्ध असलेल्या परिस्थिती शिक्षकाने मुलीचे कपडे काढून व्हिडिओ तयार केला आणि फोटो देखील घेतले. अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करुन टीचरने ते सोशल मिडियावर अपलोड करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने मुलीकडे पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.

जवळपास 4 महिने टीचर मुलीला ब्लॅकमेल करत होता. या दरम्यान घाबरलेल्या मुलीने त्याला दागिणे आणि जवळपास दीड लाख रुपये दिले. अखेर वैतागलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Visit : Policenama.com