Team India | टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये घुसून दाऊद इब्राहिमने दिली ‘ही’ ऑफर, त्यावेळी कपिल देवनं काय केलं ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट आणि अंडरवर्ल्डचे नाते जुने आहे. कपिल देव (Kapil Dev) कर्णधार असताना भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) मधील एका मॅचपूर्वी दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) टीम इंडिया (Team India) च्या ड्रेसिंग रूममध्ये घुसला होता, परंतु कपिल देवने त्याला दम देऊन पळवले. दाऊद इब्राहिमने टीम इंडियाच्या खेळाडूंना महागड्या गिफ्ट (expensive gifts) ची ऑफर दिली होती, परंतु कपिल देवने त्यास टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममधून पळवून लावले होते.

दाऊद इब्राहिमने दिली ‘ही’ ऑफर
1987 मध्ये शारजाहमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलेयन कप (Australian Cup in Sharjah) च्या दरम्यान दाऊद इब्राहिमने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन भारतीय खेळाडूंना म्हटले होते की, जर उद्या तुम्ही पाकिस्तानल हरवले तर मी सर्व प्लेयर्सला एक-एक टोयोटा कार गिफ्ट देईन. मात्र, ही ऑफर टीम इंडियाने धुडकावून लावली होती. या गोष्टीचा खुलासा स्वता त्यावेळी टीमचा भाग असलेला माजी भारतीय क्रिकेटर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) ने केला होता.

कपिल देवने दाऊदला पळवले
दिलीप वेंगसरकरने सांगितले की, कपिल देव प्रेस कॉन्फ्ररस आटोपून ड्रेसिंग रूममध्ये शिरला. त्याला टीम इंडियाच्या खेळाडूंशी काही तरी बालायचे होते. कपिल देवची नजर यावेळी दाऊदवर पडली तेव्हा त्याने विचारले हा कोण आहे. चल बाहेर जा. कपिलचे हे बोलणे ऐकून दाऊद ड्रेसिंग रूममधून शांतपणे निघून गेला आणि जाताना म्हणाला, ही कार कॅन्सल हं. वेंगसरकरनुसार या घटनेनंतर त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मिंयादाद (Javed Minyadad) आला.

जावेद मिंयादादने दिला इशारा
जावेद मिंयादाद दाऊदचा व्याही आहे. जावेद मिंयादादने म्हटले की, कपिलने दाऊदसोबत असे वागायला नव्हते पाहिजे. मित्रांनो, त्याला माहित नाही, तो दाऊद इब्राहिम आहे. त्याला काही प्रॉब्लेम करेल. यावर वेंगसरकरने उत्तर दिले की कोणतीही अडचण निर्माण करू शकत नाही. ना भारतात, ना बाहेर.

 

कपिल देवने दाऊदची माफी मागितली

या संपूर्ण प्रकरणात ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा रवि शास्त्री (Ravi Shastri) ने म्हटले की, होय कपिल देवने दाऊदला बाहेर जाण्यास सांगितले होते, पण जेव्हा तो स्मगलर असल्याचे समजले तेव्हा कपिल देवने जाऊन दाऊदची माफी मागितली होती.

रवि शास्त्रीने म्हटले की, दाऊद नेहमी येत होता.
शारजाहमध्ये सुद्धा तो आला होता.
मला तो येण्यापूर्वीच समजले होते आणि मी चहाच्या बहाण्याने बाहेर सटकलो.
नंतर कपिल दाऊदच्या जवळ गेला आणि माफी मागितली.

त्यावेळी टीममध्ये सहभागी असलेला स्पिनर मनिंदर सिंह (Maninder Singh) ने सुद्धा म्हटले की दाऊद केवळ प्रत्येक मॅचमध्येच नव्हे तर तेथील प्रत्येक पार्टीत उपस्थित रहात होता.
मनिंदरने म्हटले की, त्यावेळी आम्हाला फिक्सिंग सारख्या गोष्टींबाबत काहीही माहित नव्हते आणि ड्रेसिंग रूम (dressing room) मध्ये येण्या-जाण्यावर प्रतिबंधाही नव्हता.

Web Title :- Team India | team india kapil dev dressing room sharjah dawood ibrahim dilip vengsarkar claims

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे