BSNL कडून ग्राहकांना ‘गिफ्ट’, ‘वर्क एट होम’ ब्रॉडबँड प्लॅन डिसेंबर पर्यंत वाढवला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) ने आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलने वर्क एट होम ब्रॉडबँड योजनेच्या वैधतेत डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. घरून काम करणाऱ्या वापरकर्त्यांना या योजनेची वैधता वाढविण्याचा फायदा मिळेल.

कंपनीच्या अधिसूचनेनुसार अंदमान आणि निकोबार वगळता सर्व मंडळांमध्ये वर्क एट होम प्रमोशनल ब्रॉडबँड योजना 8 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कंपनीकडून कोणतेही इन्स्टॉलेशन किंवा सर्व्हिस चार्ज घेतला जाणार नाही परंतु वापरकर्त्याचे स्वतःचे मॉडेम असणे आवश्यक आहे.

ही योजना 90 दिवसांसाठी सुरू केली गेली :

बीएसएनएलने कोरोना साथीच्या काळात घरून काम करणाऱ्या वापरकर्त्यांच्या मदतीसाठी 90 दिवसांसाठी ही योजना सुरू केली. त्याची उपयुक्तता आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बीएसएनएलने आता ही योजना डिसेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेंतर्गत ग्राहकांना दररोज 100mbps डाउनलोड गतीसह 5GB डेटा देण्यात येतो. या डेटाच्या वापरानंतर, इंटरनेटची गती 1mbps पर्यंत कमी होते. बीएसएनएलने सिक्कीम, कोलकाता आणि पश्चिम बंगाल सर्कलसाठी 300GB प्लॅन डिसेंबरपर्यंत वाढविला आहे. 499 रुपयांच्या या योजनेत 300GB डेटासाठी 40mbps वेग मिळेल, ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेटचा वेग 1mbps होईल. या योजनेत अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉल करता येतील. ही योजना 12 डिसेंबरपर्यंत लागू आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like