5000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ‘हे’ स्मार्टवॉच स्टाईल सोबत आपल्या फिटनेसवरही ठेवेल पूर्ण ‘लक्ष’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज, स्मार्टवॉचने सामान्य घड्याळाची जागा घेतली आहे. स्मार्टवॉच आपल्याला केवळ वेळच सांगत नाही तर फिटनेसचीही काळजी घेतो. हेच कारण आहे कि लोकांमध्ये स्मार्ट वॉचचा ट्रेंड वाढत आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टवॉच सहजपणे स्मार्टफोनशी कनेक्ट होऊ शकतात. ज्यानंतर आपण आपल्या मनगटात बांधलेल्या घड्याळावरून स्मार्टफोनवर आलेले नोटिफिकेशन आणि कॉल तपासू शकता. परंतु लोकांना वाटते की, स्मार्टवॉच खूपच महाग आहेत, परंतु प्रत्येक बजेट रेंजची स्मार्ट वॉच बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घ्या अश्याच काही 5000 रुपयांत उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट स्मार्टवॉचबद्दल

रिअलमी क्लासिक वॉच
किंमत : 3,999 रुपये
ही स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून वापरकर्ते खरेदी करू शकतात. बजेट रेंजमध्ये सुरू झालेल्या या स्मार्टवॉचमध्ये रियल टाइम हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर, इंटेलिजेंस अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकर आणि आयपी 68 वॉटर रेसिस्टन्स यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे अँड्रॉइड स्मार्टफोनशी कनेक्ट केले जाऊ शकते. त्याच्या मदतीने, वापरकर्ते फोनचा कॅमेरा आणि संगीत देखील नियंत्रित करू शकतात.

नॉईस कलरफिट प्रो 2
किंमत : 3,499 रुपये
या स्मार्टवॉचमध्ये 1.3 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉलीकार्बोनेट केसने बनवलेल्या या घडाळ्यात रीड करणे आणि ऑपरेट करणे खूप सोपे आहे. खास फिचर म्हणून, यात 24×7 हार्ट रेट मॉनिटर देण्यात आले आहे. तसेच 9 स्पोर्ट्स मोड उपलब्ध असतील. यामध्ये ट्रेडमिल, वॉक, रन, हाइक, बाइक, वर्कआउट आणि योग यांचा समावेश आहे. हे डिव्हाइस आयपी 68 वॉटरप्रूफ रेटिंगसह येते.

Portronics Kronos Alpha fitness स्मार्टवॉच
किंमत : 3,999 रुपये
या स्मार्टफोनमध्ये 1.3 इंचाची टच स्क्रीन असून त्यासह 12 स्पोर्ट्स मोड आहेत. ज्यामध्ये धावणे, सायकलिंग आणि योगासारख्या क्रिया समाविष्ट आहेत. हे डिव्हाइस ब्लॅक ऑप्शनमध्ये कंपनीच्या अधिकृत साइटवर आणि ई-कॉमर्स साइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर समर्थन करण्यास सक्षम आहे.

Ambrane Pulse Smartwatch
किंमत : 3,499 रुपये
अंब्रान पल्स स्मार्टवॉचमध्ये एक समाकलित एसपीओ 2 वैशिष्ट्य आहे जे वापरकर्त्यास ऑक्सिजन पातळीवरील चढ-उतारांबद्दल नवीनतम अपडेट देईल. या स्मार्टवॉचद्वारे हार्टबीट आणि रक्तदाब देखील मोजले जाऊ शकते. यात 1.3 इंचाचा डिस्प्ले आहे. हे दोन्ही Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like