काय सांगता ! होय, आता जास्त दारू पिल्यावर तुमचा फोन करणार ‘अलर्ट’, डिव्हाइस ‘असं’ करणार काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता जर तुम्ही जास्त मद्यपान केले असेल, तर लवकरच तुमचा स्मार्टफोन तुम्हाला अलर्ट करेल. वास्तविक संशोधकांनी एक सेन्सर बनवला आहे, जो तुमच्या फोनमध्ये इन-बिल्ड असेल. या सेन्सरद्वारे युजरच्या वागण्याचा अभ्यास करुन त्या व्यक्तीने मद्यपान केले आहे की नाही ते शोधून काढले जाईल. जर तुम्ही निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान केले असेल, तर तुमचा स्मार्टफोन तुम्हाला अलार्मद्वारे इशारा देईल आणि दारू पिण्यापासून थांबवेल.

दारूची सवय असणाऱ्या लोकांची ठेवली जाईल रिअल टाईम माहिती
संशोधनात असे आढळले आहे की, जर तुम्ही मित्रांसह मद्यपान करण्यास बाहेर गेला आणि अधिक नशेत असाल तर प्रथम डिव्हाइस तुम्हाला सतर्कतेचा इशारा देईल. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यास मदत करेल. जनरल ऑफ स्टडीज ऑन अल्कोहोल अँड ड्रग्जच्या अभ्यासानुसार, या सेन्सरच्या मदतीने मद्यपी लोकांची रिअल-टाइम माहिती ठेवली जाईल, ज्यामुळे दारूचे व्यसन असलेल्या लोकांना जास्त मद्यपान करण्यास रोखेल. तसेच ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांना रोखण्यास मदत करेल. मात्र हा प्राथमिक अभ्यास आहे.

ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यास होईल मदत
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या Brian Suffoletto यांनी अमेरिकेत २१ ते ४३ वयोगटातील २२ प्रौढांवर संशोधन केले आणि मद्यपान करण्याच्या वर्तनाचा अभ्यास केला. संशोधनादरम्यान २२ प्रौढांना ०.२० टक्के कन्संट्रेटेड अल्कोहोल दिले गेले आणि या सर्व २२ लोकांच्या मागील बाजूस इलॅस्टिक बेल्टच्या मदतीने एक स्मार्टफोन बसवला गेला. यानंतर त्यांना सरळ रांगेत १० पायऱ्या चालण्यास, वळण्यास आणि नंतर १० पायऱ्या परत येण्यास सांगितले गेले. चालण्याच्या या वागणुकीत संशोधकाला आढळले की, जर प्रौढ व्यक्तीने ०.०८ टक्के मद्यपान केले असेल, तर ९० टक्के सेन्सर सर्वात जास्त मद्यपान करणारा अचूकपणे पकडतो. यापेक्षा जास्त मद्यपान करून ड्राईव्ह करण्यास अमेरिकेत मनाई आहे.

अजून बरेच संशोधन बाकी आहे
अशाप्रकारे संशोधकाने सिद्ध केले की, डिव्हाईसच्या मदतीने ड्रिंक अँड ड्राईव्ह काही प्रमाणात रोखले जाऊ शकते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, सामान्यत: लोक फोन मागच्या बाजूला ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत संशोधक पुढील संशोधन करतील, जेणेकरून फोन हातात किंवा पॅन्टच्या पुढच्या खिशात असेल तर अल्कोहोलचे सेवन ओळखले जाऊ शकेल.